जात पडताळणी समितीचे कामकाज जलद गतीने व्हावे. सांगली ज़िल्हा अल्पसंख्यांक सेलचे आंदोलनाने निवेदन.
सांगली. – प्रतिनिधी.
जात पडताळणी समितीचे कामकाज जलद गतीने व्हावे. सांगली ज़िल्हा अल्पसंख्यांक सेलच्या वतीने आयुबभाई बारगीर यांच्या नेतृत्वा खाली आंदोलन करून निवेदन देणेत आले. बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम घेतांना विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे. विज्ञान शाखेव्यतिरिक्त सीईटी मार्फत अभ्यासक्रम उदा. वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक, बॅचलर ऑफ फाईन आर्ट, एलएलबी याबरोबरच एकूण ४० अभ्यासक्रमांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करणे अत्यंत गरजेचे असून बारावीमध्ये असतांनाच ही पडताळणी आवश्यक आहे.
या साठी विद्यार्थी तसेच पालकांची ज़िल्हा जात पडताळणी समिती कडे हेलपाटे सुरु असतात..वेळेत दाखले मिळत नसलेने विद्यार्थी व पालकांना त्रास सहन करावा लागत आहे तर काही विद्यार्थीना ऍडमिशन ना मिळालेंने त्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.. तरी यातील जाचक अटी शिथिल करून व निर्णय प्रक्रिया जलदगतीने होऊन दाखले त्वरित वितरित व्हावेत… अन्यथा या पुढील काळात राष्ट्रवादी पक्षाचे वतीने मोठे आंदोलन करणेत येईल… यासाठी निवेदन देणेत आले…
या वेळी मा.गायकवाड साहेब व माने मॅडम जात पडताळणी समिती सांगली ज़िल्हा यांनी निवेदन स्वीकारलें.. याप्रसंगी अल्प संख्यानक जिल्हा अध्यक्ष आयुबभाई बारगीर, कार्याध्यक्ष इर्शादभाई पखाली,
सांगली शहर अध्यक्ष अकबर शेख उपाध्यक्ष अझहर सय्यद
मिरज शहर अध्यक्ष सुहेल सतारमेकर उपाध्यक्ष जमीर ऐनापुरे,
अल्पसंख्याक सेल युवक चे वाजिद खतीब,सांगली शहर युवक अध्यक्ष आश्रफ चाऊस, उपाध्यक्ष जुनेद जमादार,अल्ताफ जमादार,
अरिफ शेख, आतिफ पठाण,मलिक शेख, अल्लाउद्दीन शेख वसीम सय्यद व इतर पदाधिकारी उपस्तिथ होते