सहकारातून महिला सक्षमीकरण
दि. आजरा अर्बन बँक -आयोजित महिला सभासद प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी. ०६
आजरा येथील दि आजरा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मल्टीस्टेट यांच्यावतीने रविवार ६ नोव्हेंबर २०२२ महिला सभासद प्रशिक्षण कार्यक्रम अण्णाभाऊ सभागृह येथे संपन्न झाला. स्वागत चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी केले. तर प्रास्ताविक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर बॅकेची ध्येय धोरणे व दैनंदिन बॅकेच्या व्यवहाराची माहिती दिली. आण्णा -भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश सांगितला.

सहकार म्हणजे चळवळ आहे म्हणुनच वळवळ आहे. – संभाजी जाधव.
या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने सहकारातून महिला सक्षमीकरण, हक्क कर्तव्य व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्हा सहकार विकास अधिकारी जिल्हा सहकार बोर्ड कोल्हापूर संभाजी जाधव बोलताना म्हणाले. महाराष्ट्रातील दुसरी संस्था आहे. त्या संस्थेला प्रशिक्षण घेण्यासाठी सागितले आहे. हि जागतिक वाटचाल आहे. गृहिणी हि एक ओळख आहे. गृहणीचा वापर सहकारात व्हावा. व महिलांचे सबलीकरण व्हावे. सहभाग वाढावा, पण राजकीय हस्तक्षेपामुळे सहकार मोडीत निघत आहे. सहकारात काम करणाऱ्या प्रत्येकाला हक्क, कर्तव्य, जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. काही सभासद इतर अडचणी वेळी मदत किंवा अडचणी पहायला विचारायला येत नाहीत पण वार्षिक सभेत प्रश्न उपस्थित करून आपण संस्थेची काळजी असलेल्याचे दाखवतात. तुमचा तो हक्क आहे. पण संस्थेचे हित जपल पाहिजे. महिलांसाठी शिक्षण व प्रशिक्षण कडे दुर्लक्ष होत आहे. महिलांचे सबलीकरणासाठी शिक्षण व प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. या संस्थेच्या माध्यमातून आपण सर्व महिला सभासदांनी पुढे येऊन आपण व इतर महिलांना सक्षम करा. असे बोलताना श्री जाधव बोलताना म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व बीजभाषक शैलजा सूर्यवंशी अध्यक्ष कोल्हापूर महिला सहकारी बँक कोल्हापूर बोलताना म्हणाल्या महिलांचे अर्थिक सबलीकरण व्हावे यासाठी १९ मे १९७२ रोजी महिला बँकेची स्थापना केली. कारण पैसा हा जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. कुटुंबाकडे लक्ष देऊन स्वताच्या प्रगती सोबत इतर महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावे हि देखील एक देश सेवा आहे. व्यवसाय हा एक छंद आहे. तो जपला पाहिजे. असे वेगवेगळे व्यवसाय आहेत. ते बँकेची आर्थिक मदत घेऊन करता येतात जीवनात अडचणी येतात काळ कोणाला सांगुन येत नाहीत. येणाऱ्या संकटाचा सामना करत जीवनात यशस्वी झाले पाहिजे. महिलांच्या औद्योगिक संस्था चालू करून महिलांच्या हाताला काम द्या. महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे ठरले. सक्षमीकरणासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. मुलांना चांगले शिक्षण द्या. असे मार्गदर्शन केले
यावेळी उपस्थित महिलांना सौ. सुर्यवंशी यांनी आपल्या मनामध्ये पडलेले प्रश्न विचारण्यास सांगितले यामध्ये अस्मिता जाधव, नुरअली सोलापुरे, गीता पोतदार सह महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये महिलांना सगगीकरण प्रशिक्षण दिले पाहिजे. अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. – कार्यकारी अधिकारी श्री. गंभीर यांनी महिलांना संगणक प्रशिक्षण देण व महिलांनी ठेवी ठेवल्यास ७.५० टक्के व्याजदर देण्याची घोषणा केली.
यावेळी दि आजरा अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड सर्व संचालक, महिला संचालिका बँकेचे सर्व महिला सभासद तसेच नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्ष अस्मिता जाधव, श्रीमती अन्नपूर्णा चराटी, सौ. छाया सावंत, श्रीमती मालिनी शेवाळे, सौ. नुरअली सोलापुरे, गीता पोतदार,किशोर भुसारी, सौ. सबनीस आजरा शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार संचालिका प्रणिता केसरकर यांनी मानले