Homeकोंकण - ठाणेगोडसाखरची आरोप - प्रत्यारोप - प्रचार रणधुमाळी संपली. - बाजी कोण मारणार....

गोडसाखरची आरोप – प्रत्यारोप – प्रचार रणधुमाळी संपली. – बाजी कोण मारणार. – मतदानासाठी होणार रस्सीखेच

गोडसाखरची आरोप – प्रत्यारोप – प्रचार रणधुमाळी संपली. – बाजी कोण मारणार. – मतदानासाठी होणार रस्सीखेच

गडहिंग्लज. – प्रतिनिधी.

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी आता संपली असून प्रत्यक्षात आज रविवार दि ६ रोजी मतदान असून २०२२ ची निवडणूक ही गोडसाखरसाठी दुरंगी लढतीला प्रचारातील दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत प्रचाराला रंगत आणली होती. आज प्रतीक्षात मतदारांची मतदान करून घेण्यासाठी रस्सीखेच होणार आहे. मतदारांना अंतर्गत माहीत नसलेल्या गोष्टीवर जाहीर सभेत चर्चा करून एकमेकांचे पितळ उघड करण्याचे काम या निवडणुकीत नेत्यांनी केले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील या दोन्ही आमदारांच्यामधील परस्पर विरोधी लढतीची चर्चा. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे धक्कादायक आघाडीची परंपरा कायम राहिली आहे. दरम्यान डॉ.शहापूरकर यांनी आपला गट बदलून आम. मुश्रीफ यांच्या पॅनेलमध्ये सहभागी झाल्याने. आम. मुश्रीफ यांनी डॉ. शहापूरकर हेच पॅनेलप्रमुख राहिले असून गोडसाखरसाठी एकूण २१६ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी आज १७३ जणांनी माघार घेतली असून रिंगणामध्ये ४३ जण राहिले आहेत.

काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडी
विरोधी आमदार राजेश पाटील, माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, सेवानिवृत्त कामगार संघटनेचे शिवाजी खोत यांची काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडी करण्यात आली आहे.

इतर गट व अपक्ष उमेदवार
दोन्ही गटांकडून ३८ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे भाजपाच्या राजेंद्र तारळे व प्रितम कापसे यांनी अपक्ष अर्ज ठेवले होते. याबरोबरच इतर मागास गटाचे उमेदवार प्रवीण पोवार यांच्या उमेदवारी अर्जाच्या नाट्यमय घडामोडीनंतर अपक्ष म्हणून लढणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच सुरेश कुराडे यांचा महागांव हरळी गटातून तर उर्मिला पाटील यांचा महिला गटातून अर्ज राहिला आहे.

कौलगे कडगांव गटातून शाहू आघाडीतून प्रकाश शहापूकर, विश्वनाथ स्वामी, बाळासो देसाई यांच्याविरोधात काळभैरी आघाडीकडून अशोक देसाई, विकास पाटील, सुजित देसाई लढणार आहेत. गडहिंग्लज हनिमनाळमध्ये शिवराज पाटील, अशोक मेंडुले, अक्षयकुमार पाटील यांच्याविरोधात संग्रामसिंह नलवडे, शिवाजीराव खोत, विजय बाळासाहेब मोरे तर भडगांव मुगळी गटातून प्रकाश चव्हाण, सतिश पाटील यांच्याविरोधात अमरसिंह चव्हाण,बाबासाहेब पाटील भिडणार आहेत.

नूल नरेवाडी गटातून रविंद्र पाटील,सदानंद हत्तरकी यांच्याविरोधात रणजित यादव, वसंतराव चौगुले तर महागांव हरळी गटातून भरमू जाधव, प्रकाश पताडे, विदयाधर गुरबे यांच्याविरोधात बाळकृष्ण परीट, प्रदीप पाटील,संदीप शिंदे हे भिडणार आहेत. उत्पादक गटातून सोमनाथ पाटील यांच्याविरोधात शिवाजीराव खोत तर अनुसुचित जातीमधून काशिनाथ कांबळे यांच्याविरोधात परसु कांबळे यांची थेट लढत होणार आहे. महिला गटातून कविता पाटील, मंगल आरबोळे यांच्याविरोधात शुभांगी देसाई, गीता पाटील यांची लढत होणार आहे. इतर मागास गटातून दिग्वीजय कुराडे यांच्याविरोधात संजय बटकडली रिंगणात असून भटक्या विमुक्तमधून अरूण गवळी विरोधात संभाजी नाईक लढणार आहेत.

छत्रपती शाहू शेतकरी समविचार आघाडी
आमदार हसन मुश्रीफ, डॉ.प्रकाश शहापूरकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रकाश चव्हाण, अप्पी पाटील, प्रा.किसनराव कुराडे, सदानंद हत्तरकी, अप्पी पाटील, स्वाभिमानीचे राजेंद्र गडडयान्नावर, संग्रामसिंह कुपेकर यांनी एकत्र येऊन छत्रपती शाहू शेतकरी समविचार आघाडी स्थापन केली आहे.
परंतु या सर्व निवडणूक प्रचार रणधुमाळीत कोणत्या एका पॅनलला स्पष्ट बहुमत मिळेल असे सभासदांमध्ये बोलले जात नाही. पण दोन्ही पॅनल मधील १९ मातब्बर उमेदवार निवडून येतील अशी चर्चा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.