Homeकोंकण - ठाणेआजरा खानापुरात - जलजिवन मिशन योजनेंतर्गत मंजुर कामांचा शुभारंभ.- ८३ लाख ४०...

आजरा खानापुरात – जलजिवन मिशन योजनेंतर्गत मंजुर कामांचा शुभारंभ.- ८३ लाख ४० हजार रुपयांची कामे मंजूर.

आजरा खानापुरात – जलजिवन मिशन योजनेंतर्गत मंजुर कामांचा शुभारंभ.- ८३ लाख ४० हजार रुपयांची कामे मंजूर.

आजरा. – प्रतिनिधी.

खानापूर तालुका आजरा येथे जलजिवन मिशन योजनेंतर्गत मंजुर कामांचा शुभारंभ सरपंच पुनम गुरव, उपसरपंच युवराज विष्णु जाधव व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला. खानापूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या खानापूर,रायवाडा,कासारशेत येथे जलजिवन मिशन योजनेंतर्गत ८३ लाख ४० हजार रुपयांची कामे करण्यात येणार आहेत.खानापुर येथे नविन पाईप लाईन, पाण्याची टाकी,रायवाडा येथे नविन पाईप लाईन,पाण्याची टाकी,सोलार पॅनल,तर कासारशेत येथे नविन पाईप लाईन, सोलार पॅनल बसवण्यात येणार आहे.प्रास्ताविक ग्रामसेवक विशाल दुंडगेकर यांनी केले तर आभार उपसरपंच युवराज जाधव यांनी मानले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव जाधव,कल्पना डोंगरे, नामदेव गुरव, संतोष चव्हाण, मारुती धनवडे, संदीप जाधव, ठेकेदार वैभव सावंत व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या कामासाठी ग्रामसेवक व सरपंच उप. सरपंच सदस्य यांनी परिश्रम घेतले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.