Homeकोंकण - ठाणेआम्ही सारे भाऊ भाऊ जमेल तेवढे वाटून खाऊ. - आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज...

आम्ही सारे भाऊ भाऊ जमेल तेवढे वाटून खाऊ. – आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना निवडणूक रणधुमाळी.( भाग. १ )

आम्ही सारे भाऊ भाऊ जमेल तेवढे वाटून खाऊ. – आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना निवडणूक रणधुमाळी.
( भाग. १ )

गडहिंग्लज. – प्रतिनिधी.

आम्ही सारे भाऊ भाऊ जमेल तेवढे वाटून खाऊ आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू आहे दोन्ही आघाडीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू आहेत परंतु या दिशाहीन झालेल्या राजकारणाला दिशा देऊन सभासद शेतकरी कामगार यांचा हिताचा निर्णय घेऊन कारखाना यापुढे कसा चालवता येईल याबाबत समाधानकारक चर्चा होताना दिसत नाही. एकमेकाचे उने धुणे काढत आम्हाला मतदान करा अशा प्रकारचा प्रचार तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळीत सुरू आहे. पण प्रत्यक्षात सभासदांच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकी जपणा-या नेत्यांची या दोन्ही आघाडीतील काही नेत्यांना विसर पडला आहे. कै.आप्पासाहेब नलावडे व सहकारी मंडळी यांनी हा कारखाना ज्या त्यागातून कष्टातून उभा केला याचा तालुक्यातील काही नेत्यांना विसर पडला आहे. निवडणूकीसाठी दि. २७ रोजी दोन्ही आघाडीची पॅनेल रचना केली होती २०२२ ची पंचवार्षिक निवडणूक ही गोडसाखरसाठी दुरंगी लढत होणार आहे. राजकारणात कोण कोणाचा शत्रू व कोण कोणाचा मित्र नसतो याचे उदाहरण या साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिसत आहे.
राष्ट्रवादीचे आम. माजी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील या दोन्ही आमदारांच्यामधील परस्पर विरोधी गटातून लढतीची चर्चा जोरात आहे. पण सत्तेसाठी काहीही होऊ शकतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही यातील डॉ.शहापूरकर हे विरोधी गटात सामील होण्याची चर्चा होती. मात्र ते आमदार मुश्रीफ यांच्या पॅनेलमध्ये सहभागी झाले आहेत. मुश्रीफ यांनी डॉ. शहापूरकर हेच पॅनेलप्रमुख राहणार असून त्यांना पाच वर्षे चेअरमनपदाची संधी देणार असल्याचे जाहीरच आहे. गोडसाखरसाठी एकूण २१६ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी आज १७३ जणांनी माघार घेतली असून रिंगणामध्ये ४३ जण रिंगणात आहेत.

छत्रपती शाहू शेतकरी समविचार आघाडी
आमदार हसन मुश्रीफ, डॉ.प्रकाश शहापूरकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रकाश चव्हाण, अप्पी पाटील, प्रा.किसनराव कुराडे, सदानंद हत्तरकी, अप्पी पाटील, स्वाभिमानीचे राजेंद्र गडडयान्नावर, संग्रामसिंह कुपेकर यांनी एकत्र येऊन छत्रपती शाहू शेतकरी समविचार आघाडी स्थापन केली आहे.

काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडी
विरोधी चंदगड विधानसभेचे आम राजेश पाटील, माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, सेवानिवृत्त कामगार संघटनेचे शिवाजी खोत यांची काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडी असून

इतर गट व अपक्ष उमेदवार
दोन्ही गटांकडून ३८ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपाच्या राजेंद्र तारळे व प्रितम कापसे यांनी अपक्ष अर्ज ठेवले असून भाजप कोणासोबत आहे. हे निश्चित नसलं तरी एकाच पक्षातील काही नेते एकमेकांच्या विरोधात असल्यामुळे यामध्ये काही वेगळं झाल्यास काही विशेष नसाव. याबरोबरच इतर मागास गटाचे उमेदवार प्रवीण पोवार यांच्या उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून लढणार आहेत. तसेच सुरेश कुराडे यांचा महागांव हरळी गटातून तर उर्मिला पाटील यांचा महिला गटातून अर्ज राहिला आहे.

कौलगे कडगांव गटातून शाहू आघाडीतून प्रकाश शहापूकर, विश्वनाथ स्वामी, बाळासो देसाई यांच्याविरोधात काळभैरी आघाडीकडून अशोक देसाई, विकास पाटील, सुजित देसाई लढणार आहेत. गडहिंग्लज हनिमनाळमध्ये शिवराज पाटील, अशोक मेंडुले, अक्षयकुमार पाटील यांच्याविरोधात संग्रामसिंह नलवडे, शिवाजीराव खोत, विजय बाळासाहेब मोरे तर भडगांव मुगळी गटातून प्रकाश चव्हाण, सतिश पाटील यांच्याविरोधात अमरसिंह चव्हाण,बाबासाहेब पाटील लढत होणार आहे.

नूल नरेवाडी गटातून रविंद्र पाटील,सदानंद हत्तरकी यांच्याविरोधात रणजित यादव, वसंतराव चौगुले तर महागांव हरळी गटातून भरमू जाधव, प्रकाश पताडे, विदयाधर गुरबे यांच्याविरोधात बाळकृष्ण परीट, प्रदीप पाटील,संदीप शिंदे हे भिडणार आहेत. उत्पादक गटातून सोमनाथ पाटील यांच्याविरोधात शिवाजीराव खोत तर अनुसुचित जातीमधून काशिनाथ कांबळे यांच्याविरोधात परसु कांबळे यांची थेट लढत होणार आहे. महिला गटातून कविता पाटील, मंगल आरबोळे यांच्याविरोधात शुभांगी देसाई, गीता पाटील यांची लढत होणार आहे. इतर मागास गटातून दिग्वीजय कुराडे यांच्याविरोधात संजय बटकडली रिंगणात असून भटक्या विमुक्तमधून अरूण गवळी विरोधात संभाजी नाईक लढणार आहेत.


परंतु या कारखान्याच्या रणधुमाळीत कोणत्याही एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याची ही चर्चा आहे. यापूर्वी कारखाना चालवत असताना राजकीय घडामोडी पाहता सभासदांच्या मध्ये नाराजी आहे.
पण या निवडणुकीत चळवळीच्या संघटना देखील राजकीय रणधुमाळीत असल्यामुळे उद्याचा लढा हा सभासदांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभे राहतील की नाही. हा येणारा काळ ठरवेल.
परंतु या निवडणूक रणधुमाळीच्या प्रचारात आपण सभासद कामगार ऊस उत्पादक यांच्यासाठी व कारखाना सुरळीत चालवण्यासाठी काय करणार आहात याची सभासदांना हमी देणे गरजेचे आहे असं सभासदांना वाटतं. पण सध्या स्थितीच्या प्रचारात सभासदांचा सहभाग व प्रतिसाद दिसत नसल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.