आजरा शेळपचे डॉ. रुपेश पाटील यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी.– जिल्हात सर्वत्र कौतुक.
आजरा : – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील शेळप येथील डॉ. रुपेश चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी मिळवली आहे. त्यांनी “ऑरगॅनिकट्रान्सफॉर्मेशन्स युजिंग नॅचरल कॅटेलिस्ट ” या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यामध्ये त्यांनी नॅचरल रिसोर्सचा वापर करून चार नवीन कॅट्यालिस्ट (उत्प्रेरक ) तयार करून त्यांचा उपयोग त्यांनी ऑरगॅनिक रियाक्शनसाठी केला. त्यांचे या विषयावरील दहा संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित रिसर्च जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यामध्ये न्यू जर्नल ऑफ केमिस्ट्री, कॅट्यालिसीस लेटर, रिसर्च अँड केमिकल इंटरमीडिएट, हेक्ट्रोसायकिक केमिस्ट्री या आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स चा समावेश होतो . त्यांच्या संशोधनाकरिता त्यांना महाराष्ट्र शासनाकडून ‘सारथी रिसर्च फेलोशिप मिळाली तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये “बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशन अवॉर्ड” प्राप्त झाला आहे आणि यंग रिसर्च अवॉर्ड-2019 प्राप्त झाला आहे. त्यांना पी.डी.व्ही.पी. महाविद्यालय तासगाव येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ.सुरेश एस. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे अध्यक्ष, प्राचार्य, मा.अभयकुमार साळुंखे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य, मा. एम.एस. हुजरे सर, सहकारी मित्र परिवार आणि विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले.