वेळ काढून धोरण थांबवा अन्यथा मनसे स्टाईल दाखवावी लागेल. – राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदनाने सूचना.
आजरा. – प्रतिनिधी.
संकेश्वर – आजरा – आंबोली राष्ट्रीय महामार्ग वरील पडलेले खड्डे याबाबत वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करून धोकादायक बनलेल्या रस्त्यातील खड्डे किमान तात्पुरती दुरुस्ती करावी यासाठी विनंती करून समजत नसेल तर आजरा मनसे स्टाईल काय आहे. ही दाखवावी लागेल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना आजरा तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलेल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संकेश्वर – आजरा – आंबोली हा राष्ट्रीय महामार्ग पर्यटकांनी गजभवलेला असतो तसेच सद्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून रस्त्यामध्ये मोठ-मोठे खड्डे आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची व वाहने नादुरुस्त होण्याची नाकारता येत नाही यामुळे आपल्या कार्याला वारंवार निवेदन देऊन यापूर्वी दोन तास रास्ता रोको आंदोलन करून देखील आपणाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याशिवाय आजरा येथील व्हिक्टोरिया पुलावर टेलिसोनीक कंपनीकडून बेकायदेशीर खुदाई करून पुलाला धोका निर्माण झाला किंवा होईल. यासंदर्भात आजरा मनसेने वतीने संबंधित कंपन्या व ठेकेदार यांना गुन्हा दाखल करून कारवाई होण्याकरता सातत्याने पाठपुरावा केला होता सदस्य मागणीची दखल घेत व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पण या गुन्ह्याचे काय झाले याची लेखी उत्तर आम्हाला मिळाले पाहिजे तरी सदरच्या नियोजनाचा विचार होऊन येणाऱ्या चार दिवसात प्रत्यक्ष रस्ता दुरुस्तीचा कामाला सुरुवात न झाल्यास जिल्ह्याच्या मनसेच्या सर्व वरिष्ठ नेत्याच्या प्रमुख उपस्थितीत आजरा मनसेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग आजरा येथे आंदोलन करण्यात येईल यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्रमुख अधिकारी आंदोलन स्थळी स्वतः हजर राहून लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. यावेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व तालुका प्रशासन जबाबदार असेल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे., जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, ता अध्यक्ष अनिल निऊगरे, उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, चंद्रकांत सावरकर, म्हकाळी चौगुले, वसंत घाटगे, अश्विन राणे, सह पदाधिकारी मनसैनिक उपस्थित होते.
