महाराष्ट्र राज्यातील भू-विकास बँकेतील थकबाकीदार कर्जदारांचे ९६४ कोटींचे कर्ज माफ करण्याचा आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या प्रयत्नांना यश…
कोल्हापूर. – प्रतिनिधी.
राज्यातील भू-विकास बँकेतील थकबाकीदार कर्जदारांची ९६४ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे कोल्हापुर जिल्ह्यांसह शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले…
भू-विकास बँका बंद करुन बँकेच्या मालमत्ता विकून तसेच कर्ज वसुली करुन कर्मचारी, अधिकारी यांची देणी देण्याबाबतचा निर्णय २०१५ मध्ये घेण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात याबाबतील कोणतीही कार्यवाही पुढे झाली नाही. तसेच भू-विकास बँकेकडे कर्ज घेतलेल्या शेतकरी, सहकारी पाणी-पुरवठा संस्था यांचेही कर्ज माफ करण्याची मागणी विधानसभेच्या सभागृहात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केली होती…
भू-विकास बँकेतील थकबाकीदार कर्जदार गेली २५ वर्षे बँकेच्या कर्जाच्या बोजामुळे हालाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना नवीन कर्ज उपलब्ध होत नाही. वसुलीच्या नोटीसांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी व त्यांचा सातत्याने पाठपुरावा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केला. त्यावर सर्व कर्जदार शेतकऱ्यांची रक्कम माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला…
