Homeकोंकण - ठाणेएमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया...

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू

मुंबई – प्रतिनिधी.

राज्यातील सरकारी, अनुदानित, खासगी विनाअनुदानित, अल्पसंख्याक संस्थामधील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.२२ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरता येणार आहे. एमबीबीएस, बीडीएससह अन्य काही अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीची निवड यादी २८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश ‘नीट यूजी २०२२’ची परीक्षा १७ जुलैला झाली आणि या परीक्षेचा निकाल ७ सप्टेंबरला जाहीर झाला. त्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत राज्यातील सरकारी, अनुदानित, महापालिका, खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक संस्थांमध्ये आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया राज्य सरकारच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) नुकतीच जाहीर केली आहे. देशपातळीवरील रँकमधील विद्यार्थी ऑनलाइन नावनोंदणी करू शकतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.