व्यंकटराव हायस्कूलमध्ये हादगा बोळवण कार्यक्रम उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अलकाताई जयवंतराव शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली हादगा बोळवण कार्यक्रम विविध उपक्रमांनी संपन्न झाला. हादगा सनाच्या सांगता समारंभ प्रसंगी विद्यार्थिनींनी प्रशालेच्या पटांगणामध्ये हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून गोलाकार फेर धरत हादग्याची सुरात गाणी गायली. त्यानंतर प्रशालेच्या हॉलमध्ये किशोरवयीन मुलींच्या समस्या आणि त्यावर उपाय या विषयावर व्यंकटराव प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व सध्या सिंधुदुर्ग येथील डायट कॉलेजवर इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून अधिव्याख्यात्या या पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीमती सुषमा आनंदराव कोंडुसकर यांचे व्याख्यान झाले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थिनींनी आपल्या शरीराची कशी काळजी घ्यावी. तसेच आजच्या आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल च्या जमान्यात त्यात गुंतून न जाता स्वतःला अभ्यासात व एखाद्या कलेमध्ये कसे व्यस्त ठेवता येईल याकडे पाहणे आचरण करणे गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ शिंपी यांनीही विद्यार्थिनींना प्रशालेच्या कुटुंब प्रमुख या नात्याने मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे मुलींसाठी स्वतः हाल अपेष्टा सहन करत उघडी केली. आज संपूर्ण देशात मुलींची शैक्षणिक गुणवत्तापूर्ण वाटचाल ही वाखाणण्यासारखी आहे. जगातल्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत.. आज अंतराळापासून ते भारतीयसैन्यातदेखील स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे समोरच्या विद्यार्थीनिंना आपले ध्येय निश्चित करण्यासाठी त्यांनी प्रेरित केले. या कार्यक्रमातील हादग्याच्या प्रतिमापूजन प्रसंगी प्राचार्य श्री एस जी खोराटे, पर्यवेक्षक श्री एस एन पाटील, सौ व्ही जे शेलार ,सौ.एस डी इलगे, सौ बी पी कांबळे, सौ व्ही ए वडवळेकर, सौ एम एम जाधव, श्रीम.ए.के गुरव, सौ एम व्ही बिल्ले, सौ आर्.एन. पाटील, ए बी पुंडपळ, श्रीम.एन. ए. मोरे, श्रीम. एस के कुंभार, सौ जावळे मॅडम आदी शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.