Homeकोंकण - ठाणेमुमेवाडी गावालगतच्या रस्त्यावर गतिरोधक बसवावे. - आजरा मनसेची मागणी.

मुमेवाडी गावालगतच्या रस्त्यावर गतिरोधक बसवावे. – आजरा मनसेची मागणी.

मुमेवाडी गावालगतच्या रस्त्यावर गतिरोधक बसवावे. – आजरा मनसेची मागणी.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथील गावालगतच्या रस्त्यावर गतिरोधक बसवावे अशी मागणी आजरा मनसेचे मागणी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता यांना निवेदनाने केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गडहिंग्लज – उत्तुर – गारगोटी रा. मा. क्र. १८९ व मौजे मुमेवाडी गावालगत या प्रमुख रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. गावच्या बस स्थानकावर प्राथमिक शाळा असल्यामुळे भरधाव येणाऱ्या – जाणाऱ्या वाहणामुळे ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता गतिरोधक नसल्यामुळे धोकादायक होऊन अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे.. तरी यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. गंभीर दुखापत झाली आहे.. तरी येणाऱ्या पंधरा दिवसात गतिरोधक नाही बसविण्यास मनसेच्या वतीने रास्ता रोखो करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, ता अध्यक्ष अनिल निऊगरे, ता. उपाध्यक्ष आनंदा घट्टे, विभाग अध्यक्ष सुनील पाटील, शाखा , वि. सेना शाखाध्यक्ष सुनिल भिऊगडे, सचिव चंद्रकांत साबरेकर, चंद्रकांत इंगळे आदिच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.