नविन वसाहतीला महसुल गावाचा दर्जा मिळण्याकामी प्रयत्न करण्याचे व शाळा निर्माण करण्याची आम. पाटील यांची ग्वाही.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा चाफवडे येथील डाव्या तिरावरील प्रकल्पग्रस्त व यांची झालेली नवीन वसाहत या वसाहतीत सेवा सुविधा मिळण्यासाठी चंदगड विधानसभाचे आमदार राजेश पाटील यांनी नवीन वसाहतीत जाऊन आढावा घेतला.
आमदार पाटील यांचे स्वागत नविन वसाहत नियोजन समिती अध्यक्ष पांडुरंग धडाम यांनी केले, प्रस्ताविक सरपंच विलास धडाम यांनी नविन वसाहत निर्माण बाबत ग्रामस्थ यांनी केलेल्या जमिनीच्या त्यागाची व श्रमदानाची माहीती दीली व वसाहतीमधील समस्या आमदारांसमोर मांडल्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार राजेश पाटील यांनी वसाहत नियोजन समितीचे व ग्रामस्थांच्या कामाचे कौतुक केले. वसाहतीला महसुल गावाचा दर्जा मिळण्याकामी प्रयत्न करण्याचे व शाळा निर्माण करण्याची ग्वाही दीली व पुढील विकास कामांबाबत कटीबध्द रहाण्याची हमी दीली. वसाहतीला जोडणाऱ्या रस्त्यांना डोंगरी विकास निधीतून तातडीने निधी देण्याचे जाहीर केले व येणाऱ्या काळात गटर्स साठी २५ लाखांचा निधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुकूंद देसाई यांनी ग्रामस्थांनी स्वत:जमिनीत वसाहत निर्माण करून राज्यात एक नवा आदर्श निर्माण केल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले. अल्बर्ट डीसोजा यांनी चाफवडेकरांच्या त्यागामुळे आम्हाला प्रकल्पाचे पाणी मिळाले आहे, त्यांच्या अडी अडचणीत आपण शासन दरबारी प्रयत्न करू व सदैव त्यांच्या पाठीशी उभे रहाण्याची हमी दीली. अभिषेक शिंपी यांनी स्थलांतरीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू असे मत व्यक्त केले. कॉम्रेड संजय तर्डेकर यांनी वसाहतीच्या प्राथमिक तसेच धरणग्रस्तांच्या त्यागाची व्यथा व प्रकल्प ग्रस्तांच्या उर्वरीत प्रश्नांची मांडणी केली. यावेळी तालुका अध्यक्ष मुकुंद देसाई, अल्बर्ट डीसोजा, माजी सभापती रचना होलम, अभिषेक शिंपी, राजू होलम, महावितरण कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके, गटविकास अधिकारी अविनाश पाटील, पाणी पुरवठा उपअभियंता पी.डी.माने, शाखा अभियंता सतीश केदार, महावितरण शाखा अभियंता संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक सुयोग सुकवे, सरपंच वाटंगी शिवाजी नांदवडेकर, चितळे मारुती चव्हाण, रघुनाथ धडाम, तुकाराम गुरव, प्रकाश मनकेकर, परशुराम सावंत, प्रकाश मस्कर, विजय पाटील, संजय गावडे, योगेश तळेकर, अशोक धडाम, व ग्रामस्थ उपस्थित होते.