Homeकोंकण - ठाणेआजरा नेसरीकर कॉलनीत पाण्याच्या टाकीसाठी मागणी. - आम.- आबिटकर यांना निवेदन.

आजरा नेसरीकर कॉलनीत पाण्याच्या टाकीसाठी मागणी. – आम.- आबिटकर यांना निवेदन.

आजरा नेसरीकर कॉलनीत पाण्याच्या टाकीसाठी मागणी. – आम.- आबिटकर यांना निवेदन.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा एम. आय. डी. सी आजरा नजिक असलेल्या नेसरीकर कॉलनी तसेच इतर रहिवास्यांना गेली २० ते २५ वर्षे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. आज पर्यंत तेथे पाण्याची सोय करून देण्यासाठी यापूर्वी ग्रामपंचायत किंवा सद्या मागील चार वर्षात नगरपंचायतने दखल घेतलेली नाही. दोन दिवस आड पाण्याचे टँकर आणून येथील रहिवासी आपल्या पाण्याची तहान भागवत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा केला परंतु शहरालगत असलेल्या वस्तीला पाण्याची सोय करून देण्यासाठी कोणी तसदी घेतलेली नाही.
नाईक गल्लीतील समाजकार्य करणारे अली सलाम काकतीकर यांनी आम.प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क साधून येथील नागरिकांची समस्या मांडली. त्यासाठी काकतिकार यांनी आमदारांना भेटून सदर ठिकाणी आमदार फंडातून पाण्याची टाकी बांधून देण्यासाठी निवेदन दिले. आमदार आबिटकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आपण पाण्याची टाकी बांधून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. निवेदन दिले यावेळी अली काकतिकार, मुस्तकीम काकतीकर, साद काकतिकार, आब्बास नेसरीकर, गौस मुल्ला, अशपाक माणगांवकर, हजरत माणगांवकर, इजाज काकतिकार तसेच इतर नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.