ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आजरा साखर कारखाना चालू करण्याचे नियोजन. – चेअरमन सुनिल शिंत्रे. ( पत्रकार परिषदेत माहिती. )
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याने सन २०२१/२२ या वार्षिक आधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. २९ रोजी कारखाना कार्यस्थळावर गवसे. ता. आजरा येथे आयोजित करण्यात आली आहे. आजरा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आजरा साखर कारखान्याचे चेअरमन सुनील संत्रे बोलत होते. ते पुढे म्हणाले आजरा साखर कारखाना या वार्षिक वर्षांमध्ये कारखान्याने सरफेसी कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलेला कारखाना कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्र बाहेर वेगवेगळ्या संस्था व व्यक्तिगत ठेवी स्वीकारून बँकेचे कर्ज परतफेड करून कारखाना व्यवस्थापनाने स्वयंपाळावर चालण्याचा निश्चय करून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहाय्याने पुन्हा कर्ज उभारणी करून गळीत हंगाम २०२१/२२२ यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे.
या हंगामात ३५००७४.६९१ मे. टन उसाचे गाळप करून ४३४०५० क्विंटल साखर उत्पादित केली या हंगामातील सर्व ऊस बिले तोडणी वाहतूक बिले कामगार पगार तसेच कंत्राटदार व व्यापाऱ्यांची बिले वेळेत आला केली आहेत.
कारखान्याने सन २०१८/१९ हंगामातील ३१३०४७.३८३ मे. टनाची देय असणारी ऊस बीले रू ४९३.८८ प्रमाणे रू १५३७.५७ लाख देय होती आज अखेर रु. ४२१.६० लाख थकीत तोडणी वाहतुकीपोटी कंत्रालदारांना अदा केली आहे. उर्वरित शिल्लक असलेली रक्कम रु. १११.१० लाख येत्या गळीत हंगामात देण्याची व्यवस्था करीत आहोत.
साखर उत्पादकांना नंतर आवश्यक साखर विक्री करता माहे डिसेंबर 2021 अखेर रिलीज न आल्याने साखर विक्री करता आलेले नाही त्यामुळे कारखान्यावर व्याजाची आकारणी जादा झाली आहे. तसेच यापूर्वी देणे देणे करता ठेवी स्वीकारून दिले असली तरी व्याजावर जादा खर्च पडलेला आहे त्यामुळे आज अखेर कारखान्यावर असलेले कर्जाचा बोजा ज्यादा दिसत आहे.
आज अखेर कारखान्यावर रु १५६४६.११ लाख इतके कर्ज असून पैकी शासकीय व इतर कर्ज रु. १२०९९.४० लाख व मालतारण अंदाजे ४२००.०० लाख इतकी जमा होण्याची शक्यता आहे. ११४४६.११ लाखा पैकी तोडणी वाहतूक यंत्रणे करीता ८००.०० लाख खर्च झालेला आहे. सद्यस्थितीत कारखाना व्यवस्थापनाने चांगल्या प्रकारचे नियोजन केले आहे आज अखेर कारखान्याचे ओहरहोलिंग चे काम अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आजरा साखर कारखाना चालू करण्याचे नियोजन केले आहे तसेच सक्षम तोडणी यंत्रणा भरून हंगाम काळात जास्तीत जास्त गाळप करण्याचे नियोजन केले असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत कारखान्यावर गाळापासाठी येईल याची दक्षता घेणार आहे.
तसेच इतर कारखान्याच्या बरोबर ऊस दरही वेळेत अदा करणार असले बाबतची माहिती. देण्यात आली तरी सर्व उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे चेअरमन श्री. शिंत्रे यांनी बोलताना पत्रकार परिषदेत सांगितले दि. २९/९/२०२२ रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी केले.
