लाखोंची फसवणूक करून आजऱ्यातून बंटी बबली गायब. – आजऱ्यात दबक्या आवाजात चर्चा.- कोण आहेत बंटी बबली पहा. 👇
आजरा. – प्रतिनिधी.
आजऱ्यात बंटी व बबलीची (पती – पत्नीची ) शहरातील अनेक हॉटेल व्यवसाईक, व्यापाऱ्यांना लाखोचा गंडा घालून फरार झाले आहेत. ( राज्यस्थान )मधील दोघे पती – पत्नी गेल्या पंधरा दिवसापासून आजरा शहरातील एका नामांकित व्यवसाईकास पुर्वीची ओळख दाखवून संपर्क करत आपण महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार असुन यासाठी मला जमीन, घेऊन अन्य मोठ मोठे व्यवसाय करायचे आहेत. माझा परदेशात मोठा व्यवसाय आहे. पण भारतात मला पैसा गुंतवणूक करायचा आहे. माझा न्युझीलड मध्ये हॉटेल व्यवसाय आहे. आजरा शहरात दुसऱ्याच्या नावे मला तीन ते चार कोटी गुंतवणूक करून व्यवसाय करायचा आहे. सदर व्यवसाय भागीदारी मध्ये करता येईल व आपण तो व्यवसाय सांभाळावा असे आमिषे दाखवून काही व्यवसायिक या बतावणीवर विश्वास ठेवून काही हॉटेल व्यवसायिकांनी उधारीवर व दुसऱ्याच्या सांगण्यावरून जबाबदारी वरून लाखोंची उधारी दिली व सदर न्युझीलड वरून आलेला उद्योजक अचानक फरार झाल्याने उधारी वसुलीसाठी आजरा शहरातील काही हॉटेल व्यवसायिक उद्योजक व त्याची पत्नी असे बंटी व बबली फरार झाल्याने उदारीदार शोधाशोध करत आहेत. सावंतवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत शोध घेतला असता मोबाईल लोकेशन देखील सापडत नाही. अशा या बंटी बबली महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये आल्यास हॉटेल, बार, रेस्टॉरंट अशा व्यवसायिकांनी सावध भूमिका घ्यावी. कोरोना काळात व्यवसाईकांची अर्थिक घडी विस्कळीत झाली होती. आता पुन्हा घडी बसली असताना असे भामटे येतात व फसवणूक करुन जातात. व व्यवसाईक विश्वास ठेऊन उधारी देतात. या विषयाबाबत आजरा शहरात दबक्या आवाजात चर्चा होत आहे.

