कै माधराव देशपांडे परिवार वतीने मोफत रोगनिदान व औषध वाटप शिबीर संपन्न. – ( ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प अंतर्गत कार्यक्रम.)
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील खेडे येथे डॉ. व्ही.टी पाटील फाउंडेशन कोल्हापूर संचलित ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प अंतर्गत कै माधराव देशपांडे परिवार यांचे सहकार्याने मोफत रोगनिदान शिबिर व औषध वाटप दि. २३ सप्टेंबर रोजी संपन्न झाले. या शिबिरामध्ये कोल्हापूरच्या डॉ. विद्या वाघ, डॉ. सिद्धेश्वर इनामदार, सहाय्यक संगीता कांबळे व तन्वी कुडाळकर यांनी १३१ रुग्णाना तपासून औषधोपचार व मार्गदर्शन केले. तसेच महिलांच्यासाठी उपवास पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक शकुंतराव औंधकर व कोमल औंधकर यांनी घेतले त्यामध्ये साबुदाणा लाडू, उपासाचे इडली वडा, उपवासाचे धिरडे, उपवासाचे गुलाब जामुन वरीचा शिरा हे पदार्थ करून दाखवले या कार्यक्रमासाठी व्ही टी पाटील फाउंडेशनच्या अध्यक्ष सौम्या तिरोडकर सौ अंजनी देशपांडे सौ मिलन होळनकर डॉ. संदीप देशपांडे , नवदुर्गा महिला मंडळ खेडे चे सर्व पदाधिकारी या शिबिरासाठी उपसरपंच प्रकाश चव्हाण, शालेय समिती, यांचे सहकार्य लाभले भविष्यामध्ये असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती आजरा बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी दिली.
