रेशन धान्य प्रकरणी शासकीय पत्रकातील जाचक अटी रद्द करा. – आजरा कृती समितीची मागणी.
आजरा. – प्रतिनिधी.
रेशन धान्य प्रकरणी शासकीय पत्रकातील जाचक अटी रद्द कराव्या आशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार विकास अहिर यांना आजरा रेशन कृती समितीची दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. केंद्र सरकारने पुरवठा विभागला दिलेल्या परिपत्रात म्हटले आहे. की ज्या लाभार्थ्याकडे आर.सी.सी घर, फोर व्हिलर गाडी सह अन्य अटी घालून दिल्या आहेत. आशा लाभार्थी यांनी अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडावे. खरं तर अनेक बेरोजगार तरुण बॅकेचे कर्ज घेऊन मालवाहतूक, किंवा भाड्याने गाडी लावून आपला उदरनिर्वाह करत बॅकेचे हप्ते भरत असताना आशा जाचक अटी रद्द कराव्या पण ज्याच्याकडे चारचाकी गाडी तो प्रत्येकजण श्रीमंत आहे. हे म्हणणे चुकीचे आहे. शासकीय नोकरदार यांना जे लाभ मिळतात ते लाभ शेतकरी कष्टकरी जनतेला मिळत नाहीत. यामध्ये अन्नसुरक्षा योजनेतील जाचक अटी लावून गोरगरिबांना मिळणारे धान्य काढून घेणे हा निर्णय केंद्र शासनाचा चुकीचा आहे. यावर पुन्हा विचार करावा व जाचकट्टी रद्द करून नियमित अन्नसुरक्षा यादी ठेवावी व चुकीचे धोरण राबवू नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर कॉ. शिवाजी गुरव, शांताराम पाटील, दत्तात्रय तेली, अशोक पावले, अतुल पाटील, हिन्ंदुराव कांबळे, निवृत्ती मिसाळ, शांताराम हरेर, शामराव शिंदे सह लाभार्थ्यांच्या सह्या आहेत.
