Homeकोंकण - ठाणेदसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्याने आजरा शिवसैनिकांनी केला आनंद उत्सव साजरा.

दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्याने आजरा शिवसैनिकांनी केला आनंद उत्सव साजरा.

दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्याने आजरा शिवसैनिकांनी केला आनंद उत्सव साजरा.

आजरा. – प्रतिनिधी.

५० खोके एकदम ओके, – या गद्दारांचं करायचं काय खाली डोकं वर पाय. आजऱ्यात शिवसैनिकांची घोषणाबाजी करत शिवसेनेच्या दसरा मेळावाला न्यायालयाने परवानगी दिल्याने फटाक्याच्या आतिषबाजीत साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आगे बढो हम आपके साथ है. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी दसरा मेळाव्यासाठी आजरा तालुक्यातून हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर हजर राहतील अशी ग्वाही दिली विभाग प्रमुख दयानंद भोपळे यांनी न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता आम्हाला अभिमान आहे न्यायदेवतेने योग्य तो न्याय दिला या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.
यावेळी या आनंद उत्सवामध्ये शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, उप. ता. प्रमुख शिवाजी आढाव, महेश डोंणकर, महेश पाटील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख , शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.