आजरा साखर कारखान्याकडून वाटप केलेले को – व्हि. एस. आय. १८१८१ बियाणे उत्कृष्ट. – कृषी शास्त्रज्ञ सुरेश पाटील
( १८१२१ वाणाचा लागणीसाठी जास्तीत – जास्त वापर व्हावा. चेअरमन प्रा. श्री शिंत्रे. )
आजरा. – प्रतिनिधी. २२

आजरा साखर कारखान्याकडून लागण हंगाम २०२१ – २२ करिता ऊस विकास विभागामार्फत कार्यक्षेत्रात या पुर्वी शेतकरी मेळावे घेऊन वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ सुरेश पाटील तसेच वेगवेगळ्या तज्ञांना पाचारण करुन कार्यक्षेत्रामध्ये ऊसाच्या उन्नत जातीची वाढ व्हावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. श्री.माने – पाटील यांनी को व्हि. एस आय १८१२१ या जातीचे वाणाची लागण कार्यक्षेत्रात प्राधान्याने व्हावी. असे सुचवले होते. तसेच त्यांनी शिवार फेरी घेऊन त्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले होते. त्याचप्रमाणे कारखान्याने ऊस विकासाच्या माध्यमातून माती परीक्षण, ऊस पिक स्पर्धा, आणि योजना राबविण्यात आलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उन्नत व चांगले बेणे विकसित व्हावे. यासाठी ठराविक शेतकऱ्यांना बेणे मळ्यासाठी सदर वेणी या वाणाचे लागवडीसाठी माहे जानेवारी २०२२ मध्ये वितरण केले होते. सद्याच्या परिस्थितीत हे वाण को ८६०३२ पेक्षा कांडीची जाडी अधिक पाण्याची रुंदी दोन डोळ्यातील अधिक अंतर तसेच आपल्या कारखान्या कार्यक्षेत्रात जास्त पाऊस असल्याने कोही एस आय १८१२१ या वाणापासून को ९२००५ पेक्षा चांगली वाढ व एकरी दीडपट उत्पादन मिळते असे दिसून येते हे वाण अडसाली पूर्व व सुरू हंगामात लावण्यास योग्य असून कांडी, कीड व खोड – किडीस मध्यम प्रतिकारक काणी व तांबेरा रोगास पूर्णपणे प्रतिकारक आहे. को.व्हि.एस आय १८१२१ वजनास चांगले व लवकर परिपक्व होत असल्याने सदर वाण प्रचलित जातीपेक्षा कारखान्याच्या व शेतकरी सभासद यांच्या हिताचा आहे. असे दिसून येत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील उत्तुर, मडिलगे, पेरणोली, पोळगाव, आजरा व गवसे गटात निवडक शेतकऱ्यांना पर्याय योगी तत्वावर दिले असून त्यांची वाढ समाधानकारक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी सदर १८१२१ वनाच्या लागवडीसाठी जास्तीत जास्त वापर करून पुढील काळात लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचे अहवान कारखान्याचे चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे यांनी यावेळी केले आहे.