Homeकोंकण - ठाणेस्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल.- अध्यक्ष जनार्दन टोपले.

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल.- अध्यक्ष जनार्दन टोपले.

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल.- अध्यक्ष जनार्दन टोपले.

आजरा. – प्रतिनिधी.

सभासदांचा विश्वास व कर्मचारी वर्गाचे कष्टाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत स्वामी विवेकानंद पतसंस्थेची यशस्वी वाटचाल कायम ठेवली आहे. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष जनार्धन टोपले यांनी केले ते ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
सभेच्या सुरुवातीला महादेव टोपले ( बापू ) तसेच शाखा बांदा चेअरमन विजयकुमार मराठे व इतर मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांचा फोटो पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष श्री टोपले पुठे म्हणाले. आजरा तालुक्यातील विकासाची गंगा अशी ओळख असणारा आजरा साखर कारखाना आर्थिक अडचणीत येऊन बंद राहिला तो जमवाजमा करत असताना संस्थेने सभासदांना विश्वासात घेऊन व राजकीय नेते सी.ए यांचे मार्गदर्शन घेऊन संस्थेने कर्ज स्वरूपात १० कोटी रु मदत आजरा साखर कारखान्याला नवसंजीवनी दिली आहे.
सद्या संस्थेचा सुवर्ण महोत्सव सुरू असून संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षात सुवर्ण महोत्सव शुभारंभ कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक, पालक, यांच्याकरिता मार्गदर्शन करिअर घडवण्यासाठीचे व्याख्यान कार्यक्रम तसेच आजरेकरांसाठी श्री लक्ष्मी देवी उद्यान विकसित करून लोकार्पण सोहळा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेण्यात आले व इथून पुढे ही अनेक कार्यक्रम घेण्याचा मानस आहे. असे संस्थेचे अध्यक्ष बोलताना म्हणाले.
संस्थेकडे ३ कोटी ४० लाखाचे वसुली भाग भांडवल असून ५५८ कोटी पेक्षा अधिक ठेवी आहेत १२४ कोटीहून अधिक कर्ज वाटप केले असून गुंतवणूक ५१ कोटीची केली आहे संस्थेने अहवालात सालात २८३ कोटीचा व्यवसाय केला असून एक कोटी ८० लाखावर निव्वळ नफा झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले यावेळी श्रद्धांजली ठराव संचालक सुधीर कुंभार यांनी मांडला वार्षिक सभेत दहावी-बारावीतील सभासदांचे गुणवंत पाल्यांचा अहवाल सालात ७० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा माजी संचालक यांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांचा सत्कार स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. सभेची नोटीस वाचन ताळेबंद व आर्थिक पत्रकाचे वाचन जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार यांनी केले शाखा मुंबई सह मडिलगे येथील सभासदांनी अध्यक्ष जर्नादन टोपले व उपाध्यक्ष दयानंद भुसारी व जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार यांचा विशेष सत्कार केला. संस्थेच्या विषयी वाटचालीबद्दल संस्थेचे जेष्ठ सभासद सतीश कोगनेकर यांनी संचालक मंडळाचा अभिनंदनचा ठराव मांडला सभासदांच्या वतीने प्रा. सुधीर मुंज यांनी शिवाजीराव येसने शाखा मुंबईचे शाखा चेअरमन दत्तात्रय सातोशे शाखा सावंतवाडी सल्लागार पुखराज राजपुरोहित व रणजीत पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले सुवर्ण महोत्सवी भेटवस्तू देण्याच्या सूचना सभासदांचे कडून करण्यात आले संस्थेच्या कामकाजात ज्येष्ठ सभासद विजय बांदेकर, रमेश कारेकर, यांनी सूचना केल्या सभेला संचालक नारायण सावंत मलिककुमार बुरुड, रवींद्र दामले, रामचंद्र पाटील, महेश नार्वेकर, सुधीर कुंभार, सुरेश कुंभार, संजय घंटे, राजेंद्र चंदनवाले, प्रेमा सुतार, माधवी कारेकर, व शाखेचे शाखा सल्लागार मंडळ उपस्थित होते. उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.