Homeकोंकण - ठाणेराज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था सभासदांना १५ टक्के लाभांश देणारसंस्थेच्या बैठकीत निर्णय;...

राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था सभासदांना १५ टक्के लाभांश देणारसंस्थेच्या बैठकीत निर्णय; गुणप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार.

राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था सभासदांना १५ टक्के लाभांश देणार
संस्थेच्या बैठकीत निर्णय; गुणप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार.


सिंधुदुर्गनगरी/प्रतिनीधी.


जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था ओरोस या संस्थेच्या ३६ व्या वार्षिक सभेत सभासदांसाठी १५ टक्के लाभांश मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र दोन सभासदांनी जिल्हा उपनिबंधकांकडे संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरकत घेतल्यामुळे दरवर्षी लाभांश व्यतिरिक्त सभासदांना दिली जाणारे १२०० ची भेट ठेव पावती बाबत नवीन संचालक मंडळ निर्णय घेईल, अशी भूमिका संस्थेचे अध्यक्ष श्री. भाग्यवंत वाडेमीकर यांनी घेतले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ सप्टेंबरला सिंधुदुर्ग येथील कार्यालयात पार पडली. यावेळी इयत्ता १० व १२ परीक्षेमध्ये विशेष गुणप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेमध्ये कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले नाहीत. संस्थेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार या पतसंस्थेच्या निवडणुकीला ३० सप्टेंबर पर्यंत शासनाने स्थगिती दिली आहे. मात्र संस्थेची वार्षिक सभा घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून या संस्थेला परवानगी देण्यात आली होती. संस्थेच्या दोन सभासदांनी याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे हरकत घेऊन ही वार्षिक सभा रद्द करावी व लाभांशाचे वाटप नियमबाह्य झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे ही सभा वादळी ठरणार अशी चिन्हे होती. पण संस्थेचे अध्यक्ष वाडीकर यांनी सर्व प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे सभासदांना दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वाडीकर म्हणाले, आम्ही लाभांश दिला नसून अग्रमी रक्कम सभासदांना गणेश चतुर्थीपूर्वी दिली आहे. त्याला या सभेत परवानगी घेतली जाईल. त्याचप्रमाणे गेल्या ३५ वर्षात कोकणातील महत्त्वाचे गणेश चतुर्थी सणापूर्वी संस्थेने लाभांशाचे वाटप सभासदांना केले आहे. ही संस्थेची परंपरा आम्ही जपली असून कोविडच्या दोन वर्षाच्या काळातही आम्ही गणेश चतुर्थीपूर्वीच लाभांशचे वाटप केले होते. चतुर्थी सणापूर्वी १५ टक्के लाभांश सभासदांना अग्रमी स्वरूपात दिल्याबद्दल सभासदांनी यावेळी संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.