आजरा उत्तुर येथे मनसेचा गणराया आवार्ड पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील उत्तुर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्या वतीने २०२२ उत्तुर. जि. प. गणराया आवार्ड पारितोषिक वितरण समारंभ झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल होते. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुनम भादवणकर, ता अध्यक्ष सरिता सावंत तसेच निर्मला व्हनबट्टे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना जिल्हा उपाध्यक्ष श्री सुपल बोलताना म्हणाले २०२३ पासून घेतला जाणारा गणराया अवार्ड हा जिल्हा परिषद मर्यादित राहणार नाही तर तो आजरा तालुका मर्यादित असेल त्यासाठी आजरा तालुका मनसेचे सहकार्य या शाखेला राहील. असे सुपल म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष आनंद घंटे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश करंबळी यांनी केले या गणराया अवार्ड उपक्रमात १८ गणेश मंडळांनी सहभाग नोंदवला होता ग्रामीण भागातील सात गणेश मंडळांनी सहभाग घेतला ७ गणेश मंडळांना मनसे पक्षातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यापैकी प्रथम क्रमांक हनुमान कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ झुलपेवाडी, दृतिय क्रमांक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मुमेवाडी, व तृतीय क्रमांक भावेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मडिलगे यांनी मिळवला मनसे उत्तुर शाखेच्या वतीने गौरव पत्र देऊन सत्कार करण्यात आला. शहरी भागासाठी ११ गणेश मंडळांनी स्पर्धेत भाग घेतला सर्व गणेश मंडळांना मनसे पक्षातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले त्यापैकी प्रथम क्रमांक आदर्श युवा ग्रुप उत्तुर, द्वितीय क्रमांक सत्यम कला क्रीडा मंडळ भादवण, तृतीय क्रमांक गणेश मंडळ उत्तुर व उत्तेजनार्थ महादेव तरुण मंडळ उतूर यांना मिळाला त्यांचाही गौरव करण्यात आला या स्पर्धेसाठी परिवेक्षक म्हणून सचिन पवार, संदीप पाटील यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे आयोजन अश्विन भुजंग जिल्हा उपाध्यक्ष कल्याण मुंबई, कमलेश येसादे तालुका उपाध्यक्ष, अॅ .सुशांत पवार यांनी केले होते या गणराया अवार्ड कार्यक्रमाला आजरा मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल निऊगरे, सचिव चंद्रकांत साषरेकर, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, डी. बी. सुतार ज्योतिबा पवार, विद्यार्थी सेना अध्यक्ष अश्विन राणे, वाहतूक सेना अध्यक्ष चंद्रकांत इंगळे, किरण भोसले, पवन खवरे, शंकर सावंत, संजय भादवणकर, आजरा तालुक्यातील सर्व शाखेचे अध्यक्ष व पदाधिकारी मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन श्री सांबरेकर यांनी केले सुशांत पवार यांनी आभार मानले