लग्नाच्या तयारीत असलेल्या मुलावर आली वडिलांना अग्नि देण्याची वेळ.
पाटगाव मंडळ अधिकारी डी. पी. खतेले यांचे निधन..मुलाच्या लग्नासाठी होते रजेवर
देवगड प्रतिनिधी.दि.२६:-
देवगड तालुक्यातील पाटगाव मंडळ अधिकारी डी. पी.खतेले ( वय 56 ) यांचे आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इगतपुरी, नाशिक येथील मूळ गावी निधन झाले. मुलाच्या लग्नासाठी खतेले 15 एप्रिल पासून रजेवर होते.मात्र मुलाच्या लग्नाआधीच खतेले यांची प्राणज्योत मालवल्याने खतेले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाचे लग्न असल्यामुळे खतेले यांनी 15 एप्रिलपासून 15 मे पर्यंत रजा घेतली होती.मुलाच्या लग्नाची तयारी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील आपल्या मूळ गावी खतेले गेले होते. मुलाच्या लग्नाच्या पूर्वतयारीत असतानाच दुपारी खतेले याना अचानक अस्वस्थ वाटू लागले. आणि त्यांची प्राणज्योत मालवली. लग्नाच्या तयारीत असलेल्या खतेले यांच्या मुलांना आपल्या वडिलांच्या अंत्यविधी करण्याची दुर्दैवी प्रसंग ओढवला. खतेले यांच्या दुःखद निधनाने महसूल विभागात हळहळ व्यक्त होत आहे.