Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा नगरपंचायत मार्फत पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा नागरिकांचा प्रतिसाद. - अभिनंदनीय....

आजरा नगरपंचायत मार्फत पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा नागरिकांचा प्रतिसाद. – अभिनंदनीय. – मुख्याधिकारी अजिंक्य पाटील.

आजरा नगरपंचायत मार्फत पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा नागरिकांचा प्रतिसाद. – अभिनंदनीय. – मुख्याधिकारी अजिंक्य पाटील.

आजरा. – प्रतिनिधी.

माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत आजरा नगरपंचायत मार्फत पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचा मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांच्या अवाहनाला अनुसरून आजरा शहरातील नागरिकाकडून सोमवार ५ रोजी पर्यावरण पूरक गणपती विसर्जनास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गणेश मूर्ती विसर्जन नदी तलाव विहिरीमध्ये न करता आजरा नगरपंचायत मार्फत तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करून पाणी प्रदूषण टाळावे आणि ज्यांना मूर्ती दान करायची आहे. त्यांनी मूर्तीदान करावी असे आवाहन मुख्याधिकारी श्री पाटील यांनी केले होते. त्यासाठी नगरपंचायत कडून आदर्श शहरांमध्ये नवापूर नदीकाठ व वडाचा गोंड नदीकाठ या ठिकाणी गणेश मूर्ती व निर्माण स्वीकारणे करिता दोन व चित्रा नदी घाट परोली घाट बंधारा या ठिकाणी निर्माण करण्यास दोन पथके असे एकूण चार पधके तयार करण्यात आलेली होती. अण्णाभाऊ संस्था समुह आजरा आजरा सहकारी सूतगिरण मर्यादित आजरा यांच्यामार्फत निर्माल्य संकलना करता सहकार्य लावले तसेच अंदाजे ७०० ते ७५० किलो निर्माल्य संकलित झालेले आहे. याकरीता शहरातील नागरिकांचा गणेश मूर्ती दाणांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाणी प्रदूषण टाळण्यासाठी आजरा शहरातील नागरिकांचा पुढाकार अभिनंदन आहे. या माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत राबवण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गणेश उत्सव उपक्रमात नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आजरा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.