कागल भारतीय जनता पार्टीतर्फे “हर घर तिरंगा बाईक रॅली” – प्रमुख उपस्थिती.- शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे.
कागल. – प्रतिनिधी.
कागल येथे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे “हर घर तिरंगा बाईक रॅली” काढण्यात आली. कागल तालुक्यातील अनेक युवकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे, युवराज आर्यवीर घाटगे यांची या रॅलीमध्ये प्रमुख उपस्थिती होती. भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मोटरसायकलला लावलेल्या तिरंगा ध्वजामुळे वातावरण तिरंगामय झाले होते.
गैबी चौकातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला.
कागल एसटी स्टँड मार्गे मुरगुड नाका येथे पोहोचली व तेथून सिद्धनेर्ली येथे येऊन रॅलीची सांगता झाली. बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुष्पहार घालून श्री घाटगे यांनी अभिवादन केले. (सिद्धनेर्ली विद्यालयाच्या एनसीसीचे विद्यार्थ्यांनी घाटगे दांपत्यास मानवंदना दिली.)
