व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे विविध उपक्रमानी ७५ वा स्वातंत्र्य दिन ” व अमृत महोत्सवी कार्यक्रम ” संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.
व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला. आजरा म.शिक्षण मंडळाचे चेअरमन व माजी जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे हस्ते ध्वजारोहन करणेत आले. एन. सी. सी. विभागाने परेड संचलन केले.राष्ट्रगीत, प्रतिज्ञा,प्रार्थना परिपाठ सादर केले.देशभक्तीपर पथनाट्य श्रीम.ए.बी.पुंडपळ व सौ.आर.एन.पाटील यांनी दिग्दर्शित केले.गीते,भाषण यांचे सादरीकरण झाले. व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदीरच्या विद्यार्थ्यांच्या वेशभूषांचे सादरीकरण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. बी. डी. एस. परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला.व्यंकटराव हायस्कूलच्या वतीने शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम पार पाडला.यावेळी उपाध्यक्ष आण्णा पाटील ,सचिव एस पी कांबळे, खजिनदार एस डी चव्हाण, माजी प्राचार्य व संचालक एस जी देसाई , केशव पाटील , उद्योजक सचिन शिंपी, नगरसेवक अभिषेक शिंपी, प्राचार्य एस जी खोराटे, पर्यवेक्षक एस एन पाटील सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सुत्रसंचलन पी.व्ही पाटील यांनी केले