Homeकोंकण - ठाणेज्योत्स्ना प्रधान यांना पुणे विद्यापीठातर्फे पी.एचडी प्रदान.. सर्वत्र कौतुक.

ज्योत्स्ना प्रधान यांना पुणे विद्यापीठातर्फे पी.एचडी प्रदान.. सर्वत्र कौतुक.

ज्योत्स्ना प्रधान यांना पुणे विद्यापीठातर्फे पी.एचडी प्रदान

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )

विक्रोळी मधील माध्यमिक विद्यालय शाळेच्या विद्यार्थिनी ज्योत्स्ना प्रधान यांना पुणे विद्यापीठातर्फे पी एच डी प्रदान करण्यात आली आहे.यापूर्वी ज्योत्स्ना प्रधान यांनी फार्मसी ( औषध निर्माण शास्त्र) विषयात पदवी घेतली आहे. त्यांनी जवळपास २० वर्षे फार्मास्युटिकल इंडस्ट्री मध्ये काम केले आहे. या अनुभवाचा आणि संपर्काचा फायदा त्यांना फार्मा मार्केटिंग विषयात पी.एचडी करताना झाला. मूळची विक्रोळी येथील मध्यम वर्गीय परिवारात मोठी झालेल्या या विद्यार्थिनीने मोठ्या जोमाने आणि जिद्दीने मार्केटिंग सारख्या प्रामुख्याने पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात पाय रोवून काम केले. शिवाय विविध यशाच्या पायऱ्या चढत असताना कुटुंब आणि करिअर आणि शिवाय आपली डिग्री मिळवली.त्याबरोबरच त्यांनी वेळोवेळी पुण्यातील आणि मुंबई मधील मॅनेजमेंट कॉलेजेस मधून व्याख्याने देऊन अमूल्य मार्गदर्शन सुद्धा केले आहे.ज्योत्स्नाचे यश हे अशा वेगळ्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी नक्कीच प्रेरणा दायक आहे.असे मत विजया वाघमारे (जिल्हाध्यक्ष – निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र राज्य),कार्यकर्ता – जीवनविद्या मिशन,समाजसेविका – विक्रोळी पूर्व,सरचिटणीस – ईशान्य मुंबई जिल्हा महिला काँग्रेस कमिटी)यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.