स्वाभिमान गहाण ठेवला नसेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन बोला. – युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे. ( आजरा येथे शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत. )
आजरा. – प्रतिनिधी.
बंडखोर आमदारांनी स्वाभिमान गहाण ठेवला नसेल तर ज्या पक्षाच्या जीवावर निवडून आलात तो प्रथम राजीनामा द्यावा बाकी नंतर बोलू तर गद्दार आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आजरा येथे धावत्यादौरा सभेला शिवसैनिकांना संबोधित सभेत बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते आदेश बांदेकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे उपस्थित होते.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले शिवसेना पक्षप्रमुखांनी या गद्दार आमदारांना अपेक्षा पेक्षा जास्त दिल्याने त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांना ५६७ कोटीचा निधी दिला. त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती पण ते चुकीचे वागले कोणाच्या दडपणामुळे गेले माहित नाही. या सर्वच आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीही कमी केले नव्हते परंतु पक्षप्रमुख मुख्यमंत्री झालेले या आमदारांना पहावलं नसावं पण येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील सर्व जनता या गद्दार आमदारांना धडा शिकवेल असे शेवटी युवा सेना प्रमुख आदित ठाकरे तमाम आजरेकरांना संबोधित करताना म्हणाले.

यावेळी आजरा येथील संभाजी महाराज चौक भगवामय झाला होता. प्रचंड जनसमुदाय आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी उपस्थित होता. उद्धव ठाकरे आप आगे बढो हम आपके साथ है, शिवसेना जिंदाबाद गद्दार आमदारांचं करायचं काय.- खाली डोकं वर पाय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला.
यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, युवा सेनेचे विस्तारक सतीश नर्सिग, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, संभाजी पाटील, ता. प्रमुख युवराज पोवार, अकलाखभाई मुजावर, दयानंद भोपळे आदी पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.
आमदार प्रकाश आबिटकर यांना एक रुपया एक मत मागून शिवसैनिकांनी आमदार केलं पहिला विजय शिवसैनिकांनी मिळवून दिला. आता पहिला पराभव देखील शिवसैनिकच करतील असा घनाघात शिवसेना आजरा तालुकाप्रमुख युवराज पवार यांनी आपल्या भाषणात लगावला.
या धावत्या दौरासभेला उप. प्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख राजेंद्र सावंत, युवराज पोवार, आजरा तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, विभाग प्रमुख शाखाप्रमुख गटप्रमुख शिवसैनिक आजरा शहरातील व तालुक्यातील तमाम नागरिक मोठ्या संख्येने अदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी उपस्थित होते.