Homeकोंकण - ठाणेविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले.

मुंबई :-प्रतिनिधी.

येत्या १८ जुलैपासून होत असलेले विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र विधिमंडळाने अधिकृत पत्रक काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख २०२२ च्या प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार १८ जुलै २०२२ पासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. पण संसदीय कार्य विभागाच्या सूचनेनूसार हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. पण अधिवेशनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं विधिमंडळाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.