संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे १ कोटी ५७ लाख जमा.
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अनुदान जमा.
आजरा- प्रतिनिधी.
संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे गेले दोन महिने तटलेले १ कोटी ५७ लाख इतके अनुदान आज जमा झाले असून विधवा परित्यकत्या व अपंग स्त्री पुरुषांच्या खात्यावर ही रक्कम लवकरच जमा होणार आहे.
गेले दोन तीन महिने विधवा परित्यकत्या व अपंग स्त्री पुरुषांची पेन्शन मिळालेली नव्हती त्यासंदर्भात मागील आठवड्यात तहसीलदार आजरा यांना श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले होते. या निवेदनात पेन्शनची रक्कम खात्यावर आठ दिवसात जमा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. तहसीलदार आजरा यांनी निवेदनाची प्रत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयाला अपंग व विधवा परित्यकत्या निराधार स्त्री पुरुषांच्या भावना तातडीने कळविल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेत पेन्शन अनुदान आज जमा झाले. तहसीलदार आजरा यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हे अनुदान तात्काळ जमा झाल्याने संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात येत आहे.
या कामी संजय गांधी समितीचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांचेही सहकार्य लाभले.