जिल्हा बँकेची आजरा तालुक्यात ९९.७१ टक्के वसुली.
आजराः- प्रतिनिधी.
जिल्हा बँकेची आजरा तालुक्यात बँक पातळीवरील कर्जाची ९९.७१ टक्के इतकी वसुली झाल्याची माहिती संचालक सुधीर देसाई व विभागीय अधिकारी सुनील दिवटे यांनी दिली.
तालुक्यात १०८ विकास संस्थांकडून ५८ कोटी ५९ लाख एक हजार अल्प मुदत पीक कर्ज तसेच दोन कोटी ४४ लाख ६० हजार मद्यम मुदत कर्ज असे एकूण ६१ कोटी तीन लाख ६१ हजार वसुलपात्र कर्ज येणे होते. पैकी मद्यम मुदत कर्जाची संपूर्ण वसुली झाली असून एकूण वसुली ६० कोटी ८६ लाख ३१ हजार म्हणजे ९९.७१ % इतकी झाली आहे . १०५ संस्थांकडून बँक कर्जाची संपूर्ण वसुली झाली .
वसुलीसाठी बँकेचे चेअरमन आमदार हसन मुश्रिफ यांचे मार्गदर्शन ,सर्व विकास संस्थांचे चेअरमन,संचालक ,सचिव ,सभासद तसेच बँकेचे वसुली अधिकारी ,निरिक्षक,शाखाधिकारी व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
बँकेमार्फत शासनाच्या विविध महामंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची तसेच व्यक्तीगत कर्ज योजनांचीही कार्यवाही सुरु असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक देसाई यांनी केले.