मौजे आवंडी धनगरवाडा नं ३ आचानक आलेल्या आजारामुळे आठ गावठी गायी मरण पावल्याने गावकरी चिंतेत – संबधीत विभागाने उपाय योजना करावी. – नागरिकांची मागणी.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील मौजे आवंडी धनगरवाडा नं ३ ता आजरा येथे आचानक आलेल्या आजारामुळे आठ गावठी गायी मरण पावल्याने गावकरी चिंतेत आहेत. चार – पाच दिवसात हा प्रकार घडला आहे दि. ३० रोजी रात्रौ अचानक बांधलेल्या गोढ्यत गायी मरण अवस्थेत सापडल्या तसेच आता पर्यत श्री विदू बाबू कोकरे २ गायी, बयाजी गंगाराम कोकरे १ गाय, बबन विदू कोकरे १ गाय, कोडीबा गंगाजी कोकरे २ गायी, कोंडीबा धुळू कोकरे १ गाय,
जानु बाबू कोकरे १ गाय अशी आठ जनावरे दगावली असून दि. १ रोजी सकाळी ३ जनावरांना लागण झाली आहे. या गावातील लोकाना मोठा धक्का बसला आहे. पशुवैद्यकीय विभागाने तात्काळ चौकशी करून या यापुढे जनावरांना रोगराई होऊ नये व सदन जनावरे कोणत्या कारणाने दगावली हा शोध घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.