राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे जयंतीचं औचित्य साधून आजरा मडिलगेत. – वृक्षारोपण. – ध्यास जागतिक पर्यावरणाचा.
आजरा. – प्रतिनिधी.
ध्यास जागतिक पर्यावरणाचा या गोष्टीचे समाजिक भान म्हणून तरुणांसह समाजातील घटकांना गांभीर्य लक्षात येत असल्यामुळे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे जयंतीचं औचित्य साधून दि. २६ जुन रोजी पेरणोली बीट अंतर्गत असलेल्या मडिलगे, खेडे, सोहाळे , बाची ,नावलवाडी, पेरणोली, हरपवडे ,कोरीवडे, देवकांडगाव ,विनायक वाडी , साळगाव, सुलगाव, चांदेवाडी, आशा १४ गावामध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्येक गावामध्ये किमान ३० ते ७० झाडे अशी एकूण ५५० वृक्ष लावण्यात आली. सदरची वृक्ष ही ग्रामपंचायत हद्दीमध्ये, रस्त्याच्या दुतर्फा , शाळा , गायरान व इतर ठिकाणी वृक्ष लावण्यात आली या उपक्रमामध्ये आंबा, चिकू, फणस, पेरू, जांभूळ, शिवस, करंजी, चिंच,आवळा, सिल्वर, ओक, बांबू, दालचिनी, कढीपत्ता, सागवन, आशा विविध प्रकारच्या वृक्षाचे लागवड करण्यात आली. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व पदाधिकारी, सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक, मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.
तर या उपक्रमासाठी आजरा वनविभागाचे वनरक्षक कृष्णा डेळेकर तसेच समजिक वनीकरणचे श्री.डोंगळे, आजरा समृध्दी प्रोड्यूसर कंपनीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे, सर्व संचालक मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रत्येक गावामध्ये या वृक्षलागवडीचा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी लावलेली झाडें ही गावातील नागरिकांनी प्रत्येकी दत्तक दिली असून झाडांच्या पालण-पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे.
{ हा उपक्रम आजरा पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार चेतन घाटगे सह बीट मधील येणाऱ्या १४ गावातील तरुण वर्ग यांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
मडिलगे ता. आजरा येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच गणपतराव आरळगुंडकर, माजी उप. सभापती दिपक देसाई, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष. इजि. अनिकेत कवळेकर, इजि.युवराज येसणे, पोलिस पाटील श्री. सावतकर, धनाजी कुंभार, पो. अंमलदार श्री.कांबळे सह ग्रामस्थ उपस्थित होते. }

यावेळी काही पर्यावरण काम करणारे तरुण मंडळी विविध संस्थेचे चेअरमन संस्थापक यांनीही झाडे देऊन व स्वतः झाडे लावण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सहकार्य करत या पेरणोली बीडमधील गावामध्ये दहा हजार झाडे लावण्याचा ध्यास सर्वांनी घेतला आहे. यासाठी प्रत्येक गावामध्ये स्वतःपासून सुरुवात करून वृक्ष लागवड करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
