आजरा – समृद्धी प्रोड्यूसर कंपनी – व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचा शेतकरी व ग्राम उद्योजक मार्गदर्शक मेळावा संपन्न. आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनी प्रोजेक्ट देशात “टॉप टेन “मध्ये
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनी लि. आजरा व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचा संयुक्त विद्यमानाने शेतकरी व आजरा समृद्धी ग्रामीण उद्योजक मार्गदर्शक मिळावा दि. २८ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते. प्रास्ताविक आजरा समृद्धीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे यांनी केले ग्राम उद्योजकांना एमसीएल कंपनीकडून प्राप्त झालेले नियम व सुचना दिल्या येणाऱ्या पंधरा दिवसात सभासद नोंदणीचे काम पूर्ण करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाकडून राबवली जात असलेली कृषी संजीवनी मोहीम या मोहिमेबाबत कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना असून उत्पादन मालाची मूळ उत्पादकता साखळी किती गटात हाताळली जाते वेगवेगळ्या साखळीतून विश्वासहर्ता शेतकऱ्यांना मिळावी तसेच वेगवेगळे योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा कारण शेतकरी हा खूप हुशार आहे. हेच शेतकरी उद्याचे उद्योजक होण्यासाठी धडपड सुरू आहे. एखाद्या प्रकल्पा विषयी पुढे कोण येत असताना आम्ही सहकार्य करत असतो. यासाठी आजचा शेतकरी उद्याचा उद्योजक बनला पाहिजेत यासाठी आमची सहकारी नेहमी राहील. कृषी विभागात बाळासाहेब ठाकरे कृषी योजना, प्रधानमंत्री यंत्र योजना अशा वेगवेगळ्या योजना कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जातात याचा लाभ शेतकरी घ्यावा. व एम. सी. एल कंपनी ही कृषी विभागाच्या धोरणानुसार आजरा समृद्धीच्या माध्यमातून तालुक्यात चांगल्या पद्धतीचे काम करून शेतकऱ्यांच्या हाताला काम देत आहे. याचाही लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. असेही आवाहन यावेळी सहसंचालक श्री बिराजदार यांनी आपल्या मनोगतातून शेतकऱ्यांना केले. विभागीय कृषी अधिकारी सौ भाग्यश्री पोवार यांनी काजू उद्योगावर तसेच चारसूत्री भात लागवड खतांचा वापर कसा करावा यासाठी जमीन आरोग्य पत्रिका याचा अभ्यास करावा वन शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे पोवार बोलताना म्हणाल्या. यावेळी ‘खतांचा संतुलित वापर’ या बाबत मार्गदर्शन अक्षय खानविलकर यांनी केले तसेच डॉ निलकुमार ऐतवडे यांनी ‘खत बचत’ या विषयावर शेतक-यांना मार्गदर्शन केले शेतकऱ्यांना पडलेल्या विविध प्रश्नाची सकारात्मक उत्तर देऊन समाधान केले, आजरा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री खोराटे यांनी पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी योजनेची लाभार्थ्यांना माहिती दिली.
[ या शेतकरी मेळाव्यात आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे ग्राम उद्योजक यांना एम सी एल कंपनी कडून प्राप्त झालेले किटचे वाटप व प्रत्येक गावात ग्राम उद्योजक यांनी चांगल्या पद्धतीने सभासद नोंदणी केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते किट वाटप व सत्कार करण्यात आला. ]
या शेतकरी मेळाव्यासाठी अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री मोमीन तसेच आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे संचालक व आजरा अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे, संचालक रामचंद्र मुरकुटे आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे सर्व ग्राम उद्योजक, कार्यालयीन स्टाफ तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन आजरा समृद्धीचे संचालक (पत्रकार ) संभाजी जाधव यांनी केले. आभार संचालक नारायण मुरुकुटे यांनी मानले.
