Homeकोंकण - ठाणेउद्धव साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी; कोल्हापुरात आज शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन.

उद्धव साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी; कोल्हापुरात आज शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन.

उद्धव साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी; कोल्हापुरात आज शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन.

कोल्हापूर : – प्रतिनिधी.

उद्धव साहेब, तुम्हीच आमचे कुटुंबप्रमुख, आम्ही तुमच्या पाठीशी… असे म्हणत आज कोल्हापुरात शिवसैनिक रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता दसरा चौकातून छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होणारी पदयात्रा शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून संघर्षाची धार तीव्र होणार आहे.
शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, खासदार, माजी आमदार यांच्यासह कट्टर शिवसैनिक सहभागी होणार आहेत.
शिवसेना आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. राज्यपातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. याचवेळी काल, बुधवारी सायंकाळी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी, संघर्षास तयार असल्याचे वक्तव्य केल्याने शिवसैनिकही पेटून उठले आहेत. जागोजागी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू केली आहेत. कोल्हापुरातही उद्या, शुक्रवारी आंदोलन केले जाणार आहे. यानिमित्ताने कोल्हापुरातील जनता, शिवसैनिक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचा संदेशच दिला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.