विधवा प्रथा बंदीचा मडिलगेत नागरिकांनी घेतला निर्णय. –
अनिष्ट प्रथेबाबतच्या ऐतिहासिक शासन निर्णयामुळे. समाजातील या अनिष्ट रूढी मुळे महिलांची होणारी अवेहलना थांबणार आहे. – मडिलगे नागरिक.
आजरा. – प्रतिनिधी.
मडिलगे ता.आजरा येथील नागरिकांच्या वतीने मंगळवार दि. २४ जून २०२२ रोजी ग्रामपंचायतीच्या व नागरिकांनी अनिष्ट विधवा प्रथा बंद करनेबाबतचा निर्णय घेण्यात आला. या विषयाबाबत नागरिक तरुण मंडळी यांच्या वतीने निर्णय घेण्याचे ठरले या अनुषंगाने २४ जून २०२२ रोजी गावातील तानाजी मुरकुटे वय ५५ हे अल्पशा आजाराने निधन झाले. यानंतर या प्रथेला सुरवात करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रा पं तीने घेतलेल्या या अनिष्ट प्रथेबाबतच्या ऐतिहासिक निर्णयाचे व शासन निर्णयाचे स्वागत कारण समाजातील या अनिष्ट रूढी मुळे महिलांची होणारी अवेहलना स्त्रियांना मिळणारा मानसन मिळत नाही. या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करत आपला मडिलगे गाव हा समाजातील चांगल्या बदलासाठी नेहमीच अग्रेसर असतो. हा निर्णय अतिशय योग्य व क्रांतिकारक असून तो सामाजिक जीवन जगताना पाळला पाहिजे अशी शपथ घेतली पाहिजे.
अंमलबजावणी स्वतः पासून करण्याचे ठरवले या अनुषंगाने उपस्थित. हा निर्णय या गावात जरी झाला असला तरीही महिलांनीच महिलांना धाडस देऊन या निर्णयाचे स्वागत करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच ग्रामसभेत ठराव करून विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाचे स्वागत व प्रति बंदीचा निर्णय घेण्याचा ठराव करण्यात येणार असल्याचे सरपंच गणपतराव आरळगुंडकर यांनी सांगितले.
