काँग्रेसचे नेते राहुल गांधींची ईडीची चौकशीच्या निषेधार्थ आजऱ्यात निदर्शने.
आजरा. – प्रतिनिधी.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या निषेधार्थ आजरा येथील काँग्रेसच्या वतीने संभाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.
भाजप केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने कायदा हातात घेऊन ईडीची चौकशी लावत आहे. पुढील काळात होणारा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे विरोधकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने हि चौकशी करण्याचा उद्योग केंद्रातील भाजप सरकारने चालवला आहे. यासाठी ईडी हे यांचे प्रमुख हत्यार आहे. याचा आम्ही आजरा काँग्रेसच्यावतीने निषेध करतो व ही जाणीवपूर्वक केली जाणारी ईडीची चौकशी ताबडतोब थांबवावी अशी मागणी करत ‘राहुल गांधी आप आगे बढो हम आपके साथ है’, ‘नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी आजरा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. यावेळी गोकुळीच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, माजी पंचायत समिती सदस्य बशीरभाई खेडेकर, नगरसेवक किरण कांबळे, अभिषेक शिंपी, तसेच अमित खेडेकर, नौशाद बुड्डेखान सह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.