Homeकोंकण - ठाणेइंडियन इकॉनॉमिक रिसर्चचा आजरा सूतगिरणी पुरस्कार. ( राष्ट्रीय विकासातील योगदानाबद्दल झाला सन्मान...

इंडियन इकॉनॉमिक रिसर्चचा आजरा सूतगिरणी पुरस्कार. ( राष्ट्रीय विकासातील योगदानाबद्दल झाला सन्मान ) .

इंडियन इकॉनॉमिक रिसर्चचा आजरा सूतगिरणी पुरस्कार. ( राष्ट्रीय विकासातील योगदानाबद्दल झाला सन्मान ) .

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील अण्णाभाऊ सूतगिरणीला इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट रिसर्चचा असोसिएशन्स दिल्ली ‘इडरा’ या संस्थेकडून आत्मनिर्माण भारत योजनेच्या सहभागी होऊन राष्ट्रीय विकास योजनेचे विशेष योगदान दिल्याबद्दल फास्टेस्ट प्रोइंग इंडियन कंपनी एक्सलन्स अॅवाॅर्ड प्रदान करून गौरवण्यात आले आजरा सूतगिरणी सह देशभरातील कोरोणा काळा नंतर उद्योग पुन्हा नव्या जोमाने सुरू व्हावे. व अर्थव्यवस्थेला चालना मिळावी याकरिता केंद्र शासनाने आत्मनिर्भर होऊन भारत ही महत्वकांक्षा योजना राबवली यामुळे उद्योगांना तसेच कामगार वर्गाला काम मिळावे या उद्देशाने विविध सहकारी योजनेचा समावेश होता त्याअंतर्गत आजरा सुतगिरण दुर्गम व डोंगराळ भागात असूनही या सूतगिरणीने विविध योजना राबवण्यात पुढाकार घेतला या योजनेद्वारे फायदे संस्थेस त्याप्रमाणे कामगार वर्गाला मिळवून दिले या करता इंडियन इकॉनोमिक डेव्हलपमेंट रिसर्च असोसिएशन दिल्ली या संस्थेने आजरा सुतगिरणीस या कंपनीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला. नुकताच हा पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला आहे. कापसाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असल्यामुळे वस्त्रोउद्योगांमध्ये कापसाचे दर व सुताचे दर यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. सर्व संस्थांना या कापूस दरवाढीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे त्यामुळे सूतगिरण्या बंद ठेवाव्या लागत आहेत. याचे एक प्रकारे नकारात्मक वातावरण कामगार वर्गामध्ये संस्थांमध्ये तयार होत आहेत. अशा वातावरणात आजरा सुतगिरणीस पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, संस्थेचे अध्यक्ष अन्नपूर्णादेवी चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, सर्व संचालक मंडळ, मार्गदर्शक व जनरल मॅनेजर अमोल वाघ, चीप अकाउंट विष्णू पवार पर्सनल ऑफिसर सचिन सटाले परचेस ऑफिसर राजेंद्र धुमाळ चीफ इंजिनियर आर.ए. पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर श्रीकांत कुलकर्णी, यासह अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या पुरस्कारामुळे आजरा सूतगिरणीचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.