आजरा मडिलगेत गॅस कनेक्शन वितरण व ओपन जीम उद्घाटन सोहळा संपन्न.
आजरा, ता. १५ (प्रतिनिधी)

मडिलगे (ता.आजरा) येथे बुधवार दि. १५ जून रोजी गॅस कनेक्शन वितरण, बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप व ओपन जिम उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यस्थानी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ होते. प्रास्ताविक सरपंच गणपतराव आरळगुंडकर यांनी केले. यावेळी अध्यक्ष स्थानावरुन बोलताना नवीद मुश्रीफ म्हणाले.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ओपन जीम आणण्यास मुश्रीफ साहेबांचे योगदान आहे. बांधकाम कामगारांह विविध योजना विकास कामे या गावात केली आहेत. कोणतेही काम या गावात शिल्लक राहणार नाही. तसेच गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा दाम देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तोट्यात गेलेला गोकुळ दूध संघ १२ कोटी रुपये नफ्यात आणला आहे. सद्या १६ लाख नफ्यात गोकुळ दूध संघ असून २० लाख नफा गाठण्याचा नूतन संचालक मंडळाचा मानस आहे. या वेळी दोन रुपये दर वाढवून देण्याचा निर्णयही घेण्यात येईल तुम्ही फक्त काम सुचवा आम्ही काम करायला तयार आहोत. असे शेवटी गोकुळचे संचालक श्री मुश्रीफ म्हणाले.
मडिलगे ग्रामपंचायत सभागृहात ग्रामपंचायत व संयुक्त वन व्यवस्थापन समिती मडिलगे यांच्या मार्फत गॅस कनेक्शन वितरण करण्यात आले तसेच पं. स. चे माजी उपसभापती दिपक देसाई, सामाजिक कार्यकर्ते बापू निऊंगरे व आनंदा घाटगे यांच्या सहकार्यातून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करण्यात आलेल्या बांधकाम कामगार लाभार्थ्यांना सुरक्षा किटचे वाटप असा संयुक्त वाटप करण्यात आले. सदर साहित्यांचे वाटप व उद्घाटन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. कारखाना संचालक वसंतराव धुरे, माजी सभापती भिकाजी गुरव, हनुमान समुहाचे प्रमुख के. व्ही. येसणे, माजी उपसरपंच बापु निऊगरे, यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे काशिनाथ तेली, शिरीष देसाई, मारुतीराव घोरपडे व वनक्षेत्रपाल स्मिता डाके, वनपाल, वन विभाग स्टाप, माजी उप. सभापती शिरिष देसाई, युवक राष्ट्रवादी क्राॅग्रेस ता. अध्यक्ष अनिकेत कवळेकर, भावेश्वरी समुह सर्व पदाधिकारी, हनुमान समुह सर्व पदाधिकारी, हसन मुश्रीफ फाऊंडेशन कार्यालय प्रमुख सुधीर सावंत सह लाभार्थी, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी सरपंच शिवाजी गुरव यांनी केले कार्यक्रमाचे व विविध कामे केल्याबद्दल पाहुण्याचे व उपस्थित लाभार्थी यांचे आभार व नवीन कामाच्या सूचना माजी उपसभापती दीपक देसाई यांनी मांडल्या.

