Homeकोंकण - ठाणेमहाविकासआघाडी सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल. आम्हाला काहीही करावं लागणार नाही. - अमित...

महाविकासआघाडी सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल. आम्हाला काहीही करावं लागणार नाही. – अमित शहा.

महाविकासआघाडी सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल.
आम्हाला काहीही करावं लागणार नाही. – अमित शहा

नवी दिल्ली. वृतसंस्था. २०.

महाराष्ट्रातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्थापीत केलेले महाविकासआघाडीचे सरकार लवकरच कोसळणार असा दावा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वारंवार केला जात आहे. यात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांनीच लवकरच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शहा यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत आहेत.

अमित शहा यांनी ‘टाइम्स नाऊ’ला विशेष मुलाखत दिली आहे. त्यात त्यांना राज्यातील ठाकरे सरकार किती दिवस चालेल असा सवाल करण्यात आला होता. त्यावर शहा यांनी थेट उत्तर दिलं. शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करावं लागणार नाही, असं शहा म्हणाले.

अमित शहांनी यावेळी शिवसेनेला देखील डिवचल्याचे पाहायला मिळाले. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीत शिवसेना हाच मोठा पक्ष राहिला आहे. किंबहुना शिवसेनेच्या खांद्यावरच राज्यात भाजप मोठा झाला आहे. फक्त गेल्या दहा वर्षात राजकीय वारं बदलल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसला. त्यामुळेच शहा यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलं आहे, असं राजकीय निरीक्षक सांगतात. ठाकरे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी थेट भाजप सरकार पाडणार असं म्हटलं नाही. मात्र, ठाकरे सरकार कोसळणार हे सांगून त्यांनी बरेच संकेत दिले आहेत, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. त्यामुळे शहा यांच्या वक्तव्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.