Homeकोंकण - ठाणेराष्ट्रपती निवडणुकीत भाजपचे पारडे जड. - राज्यसभेतील विजय फायद्याचा.

राष्ट्रपती निवडणुकीत भाजपचे पारडे जड. – राज्यसभेतील विजय फायद्याचा.

राष्ट्रपती निवडणुकीत भाजपचे पारडे जड. – राज्यसभेतील विजय फायद्याचा.

नवी दिल्ली. वृत्तसंस्था.

विविध राज्यांत झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष २४ पैकी २० जागाच राखेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र भाजपने २२ जागा जिंकल्या आणि अनेक ठिकाणी अपक्षांचा विजय सोपा केला. विरोधी गटांतील आमदारांची आणि अपक्षांची मते मिळवण्यातही भाजप विजयी ठरल्यामुळे आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजप आणखी बळकट झाल्याचे मानले जात आहे.
राज्यसभा विजयाने भाजपसोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात ‘एनडीए’लाही बूस्ट मिळाल्याचे बोलले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणामध्ये पक्षाने आखलेली रणनीती प्रत्यक्षात उतरली आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय साकारला. अपक्षांना पाठिंबा देऊन किंवा प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात फूट पाडून स्वत:च्या उमेदवारांना फायदा मिळवून देण्यात भाजप यशस्वी ठरला. राजस्थान वगळता इतर सर्व राज्यांमध्ये प्रत्येकी एक अतिरिक्त जागा भाजपच्या पदरात पडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या कळपाला एकत्र ठेवण्यात यश मिळवलेच, शिवाय अपक्ष, मावळते खासदार आणि माध्यम उद्योजक सुभाष चंद्रा यांना निवडून आणण्यासाठी भाजपचा प्रयत्न हाणून पाडला. महाराष्ट्रातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सहापैकी तीन जागा जिंकल्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला जोरदार टक्कर दिली. कर्नाटकातही चारपैकी तीन जागा जिंकून काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला ‘टफ फाइट’ दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंग हुडा यांना धक्का बसला, कारण पक्षाचे उमेदवार अजय माकन पराभूत झाले. त्यांचे एक आमदार कुलदीप बिश्नोई यांनी भाजप समर्थित अपक्ष कार्तिकेय शर्मा यांना मतदान केले.

काय सांगते आकडेवारी ?
१५ राज्यांत ५७ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. ११ राज्यांत ४१ जागा बिनविरोध निवडून आल्या. १६ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या विजयाची आकडेवारी महत्त्वाची ठरणार असून, भाजपचे पारडे आणखी बळकट झाले आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी १०.८६ लाख मतांचे एकूण मूल्य आहे. त्यापैकी भाजप आणि ‘एनडीए’तील पक्षांकडे ४८ टक्क्यांपेक्षा जास्त मते आहेत. बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस यांसारख्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन भाजप अपेक्षित आकडेवारी गाठू शकतो, असे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.