HomeUncategorizedरखडलेल्या कोचरी लघु पाटबंधारे योजनेस अखेर मुंजरी,केतन भोज यांच्या पाठपुराव्याला अखेर यश.

रखडलेल्या कोचरी लघु पाटबंधारे योजनेस अखेर मुंजरी,केतन भोज यांच्या पाठपुराव्याला अखेर यश.

रखडलेल्या कोचरी लघु पाटबंधारे योजनेस अखेर मुंजरी,केतन भोज यांच्या पाठपुराव्याला अखेर यश.

वडाळा.प्रतिनिधी – शांताराम गुडेकर

लांजा तालुक्यातील कोचरी गावाला भेडसावणारी पाणी टंचाई आणि रखडलेल्या कोचरी लघु पाटबंधारे योजने संदर्भात घाटकोपर पश्चिम येथील रहिवाशी माहिती अधिकार/सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव केतन भोज हे मागील अनेक वर्षांपासून शासन दरबारी आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत होते.त्यांनी या रखडलेल्या प्रकल्पाला निधी मंजूर होण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत.भोज यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून,त्यानुषंगाने कोचरी लघु पाटबंधारे योजनेस निधी उपलब्ध होऊन प्रशासकीय मान्यता मिळून निविदास्तरावर कार्यान्वित आहे.मृद व जलसंधारण विभागाद्वारे हे कामे करण्यात येणार आहे.परंतु महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाला मुदत वाढ नसल्याने आणि निधी उपलब्ध नसल्याने ही योजना मंजुरीसाठी मागील अनेक वर्षे शासनस्तरावर प्रलंबित होती.सदर योजनेबाबत आवश्यक निधीसाठी शासन तरतूद करून महामंडळाच्या ५० व्या बैठकीमध्ये सदर योजनेची आवश्यकता तपासून नव्याने प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार सदर योजनेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून या योजनेस निधी उपलब्ध करून शासनस्तरावर मान्यता देण्यात आली आहे.केतन भोज यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर कोचरी लघु पाटबंधारे योजनेस ४०९८.०६ रुपये ईतका निधी प्राप्त झाला असून सदर योजनेमुळे कोचरी गावातील ग्रामस्थांना लवकरच पाणीटंचाईपासून मुक्तता मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.