वडाळा येथील आनंदवाडी भागात गटारावरील झाकणांची बिकट परिस्थिती
(रहिवाश्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता.)
वडाळा (शांताराम गुडेकर )

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण वार्डाच्या विभागातील आर जे गायकवाड (दादा) मार्गावरील, आनंदवाडी, पंचशील नगर, बरकत अली नगर, गौतम नगर, या भागातील नाले – गटारांची खूपच बिकट अवस्था झालेली आहे.त्यामुळं येथील रहिवाशांमध्ये भितेचे वातावरण निर्माण झालं आहे.याकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकार लक्ष देतील का? बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी पाऊसाच्या आधी सर्व नालेसफाईची कामे केली जातात. पण ह्या वेळी पाऊसाळा सुरू झाला तरीही या वरील विभागातील नालेसफाईची कामे झालेली नाहीत. तसेच गटारांवरील सर्वच झाकणं जर्जर झालेली आहेत. त्यामुळे येत्या पावसात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यावर BMC ने त्वरित काम करून घ्यावं त्याबद्दल वडाळा येथील विश्वदिप झटपट सेवा मंडळ (रजि)चे अध्यक्ष आकाश गायकवाड, सरचिटणीस विजय देवळेकर खजिनदार जितेंद्र गायकवाड, महेंद्र गायकवाड आणि सर्व पदाधिकारी, विभागातील रहिवाशांकडून बृहन्मुंबई महानगरपालिका एफ दक्षिण वार्ड मध्ये निवेदन देण्यात आले.