कार्यकारी संचालकसह ५ जणांना पोलिसांनी संशयीत म्हणून अटक. – आजरा पोलिसांचे सभासदाकडून अभिनंदन..
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखाना बेअरिंग चोरीप्रकरणी वादाचा बनलेला चोरी प्रकरणाच्या विषयाला आजरा पोलीसांच्या तपासात वेगळेच वळण मिळाले चोरीची फिर्याद देणारे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक आरोपी झाले आहेत. कार्यकारी संचालकसह ५ जणांना पोलिसांनी संशयीत म्हणून अटक केली याबाबत आजरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमचे तालुक्यात अभिनंदन होत आहे. कारखाना संचालकांनीही चौकशी समिती स्थापन केली होती. ७ सदस्यीय या समितीने ३४ जणांना जबाबदार धरले होते. यामुळे कर्मचारी यांच्या मध्ये संभ्रमाचे व निराशाजनक वातावरण पसरले होते. दरम्यान दि. १० रोजी ५ आरोपीना अटक असलेल्यांमध्ये फिर्यादी व आरोपी असल्याने यामध्ये आणखीन प्रमुख सूत्रधार चोर कोण असणार याची चौकशी होऊन मुख्य सूत्रधारासह आरोपींना ताब्यात घ्यावं. अशी मागणी तालुक्यातील नागरिक व सभासद वर्गातून होत आहे.

पाच आरोपी पोलिसांनी केले अटक. – सभासदांनी केले पोलिसांचे अभिनंदन. – सभासद. – सुनिल शिंदे
आजरा कारखाना बेअरिंग चोरीप्रकरणी तपास लवकरात लवकर होऊन आरोपींना ताब्यात घ्यावे अशा आशयाचे निवेदन सभासद सुनील शिंदे यांनी दि. २४/५/२०२२ रोजी आजरा पोलिसांना दिले होते. याबाबत तपास समाधानकारक करत आजरा पोलिसांनी पंधरा दिवसात पाच आरोपींना ताब्यात घेतले याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारगुडे व त्यांच्या टीमचे श्री शिंदे यांनी अभिनंदन करुन पुढील तपास लवकरच होऊन आरोपींना ताब्यात घ्याव. व सद्या सापडलेले चोराबरोबर पाण्याखालील हिमडोंगर सापडणे गरजेचे आहे या चोरांना अभय देणाऱ्या काही शक्ती असू शकतात स्क्रॅप घेणाऱ्या आरोपीने त्यांचे हात ओले केले असण्याची शक्यता आहेच. त्यांचाही शोध घेणे गरजेचे वाटते आपण शेतकऱ्याची दौलत वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. शेतकऱ्यांचे आशीर्वाद व देव तुमच्या पाठीशी आहे आपण चांगल्या कामगिरी केल्याबद्दल आपले पुन्हा एकदा अभिनंदन परंतु या चोरांचा पाठीराखे चोर कोण आहेत. याचा तपास लवकरात लवकर करावा असे दिलेल्या अभिनंदन पत्रात म्हटले आहे.