Homeकोंकण - ठाणेदेशाला २१ जुलैला नवे राष्ट्रपती मिळणार. -१८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान.- निवडणुक आयोगाची...

देशाला २१ जुलैला नवे राष्ट्रपती मिळणार. -१८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान.- निवडणुक आयोगाची घोषणा

देशाला २१ जुलैला नवे राष्ट्रपती मिळणार. –
१८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान.- निवडणुक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.

देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहे. २१ जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. कारण देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे.

18 जुलैला यासाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. याआधी देशाच्या पुढील आणि 15 व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. गेल्या 45 वर्षांपासून याच निवडणुक पद्धतीने राष्ट्रपतींची देशाच्या सर्वोच्च पदी निवड होत आहे. 17 जुलै 2017 रोजी अखेरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या. राष्ट्रपती निवडण्यासाठी सामान्य लोक मतदान करत नाहीत. तर त्यासाठी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि वरच्या सभागृहातील लोकप्रतिनिधी मतदान करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दोन्ही सभागृहांचे सदस्य लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करतील. नव्याने राष्ट्रपदी होण्यासाठी काही नावंही चर्चेत आहेत.

असा असेल निवडणूक कार्यक्रम.

15 जून अधिसूचना जारी होणार
29 जून उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख
2 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार
18 जुलै, मतदान होणार
21 जुलै, निकाल लागणार
24 जुलैपर्यंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ
मतदान करण्यासाठी निवडणूक आयोग मतदारांना पेन देणार
5,43200 इतके यंदाच्या मतांचे मूल्य
4809 मतदार मतदानाचा हक्क बजावणार
776 खासदार, 4033 आमदार मतदान करणार
संसद आणि विधानसभांमध्ये पार पडणार मतदान प्रक्रिया
10 दिवस आधी सूचना केल्यावर हव्या त्या मतदान केंद्रावर मतदान करता येणार
राजकीय पक्षांना मतदारांना व्हीप लागू करता येणार नाही
.

राष्ट्रपतीपदासाठी पाच नावं चर्चेत?

राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत सध्या पाच नावे चर्तेत असल्याचीही माहिती समोर आले आहे. विशेष म्हणजे या सर्व चारही महिला असल्याने पुढच्या राष्ट्रपती या महिला असण्याचीही दाट शक्यता आहे. यात चर्चेतली चार नवे तर सध्या विविध राज्याच्या राज्यपालपदी विराजमान आहेत, यात कुणाची नावं चर्चेत आहेत?ती पुढीलप्रमाणे:-

👉राष्ट्रपतीपदासाठी चर्चेतली नावं?

♻️माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन

♻️उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल

♻️छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके

♻️तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन

झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू

यावेळी भारताला महिला राष्ट्रपती मिळणार?

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपद हे आजपर्यंत आदिवासी महिलेला मिळालेलं नाही. याचा विचार करता, मुर्मू आणि उईके या दोन आदिवासी महिला आहेत, त्यातील एका महिलेला राष्ट्रपतीपद दिलं जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कुणाला मतदान करता येणार नाही?

काही सदस्य देशात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत. त्यामध्ये राज्यपाल नियुक्त सदस्य आणि विधान परिषदेच्या सदस्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री विधान परिषदेचा सदस्य असेल तर त्यालाही राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही. आजच हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने देशाच्या सर्वोच्च पदासाठी निवडणूक लागली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीच्या हलचालीही वेगाने सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांतच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.