Homeकोंकण - ठाणेबोलकेवाडी प्राथमिक शाळेचे छप्पर मोडकळीस. - कोणी छप्पर देता का ? छप्पर.....

बोलकेवाडी प्राथमिक शाळेचे छप्पर मोडकळीस. – कोणी छप्पर देता का ? छप्पर.. जि. प. प. स. ने पावसापुर्वी करावी डागडुजी. – शाळा व्यवस्थापनाची मागणी.

बोलकेवाडी प्राथमिक शाळेचे छप्पर मोडकळीस. – कोणी छप्पर देता का ? छप्पर.. जि. प. प. स. ने पावसापुर्वी करावी डागडुजी. – शाळा व्यवस्थापनाची मागणी.

आजारा. – प्रतिनिधी.

बोलकेवाडी ता. आजरा येथील प्राथमिक शाळेचे छप्पर मोडकळीस आले आहे. यासाठी- कोणी छप्पर देता का.? छप्पर असे म्हणण्याची वेळ ग्रामपंचायत, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व पालक विद्यार्थी यांच्यावर आली आहे.
जि. प. प. स.ने पावसापुर्वी डागडुजी करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांताराम बोलके व समिती सदस्य व ग्रामस्थ यांचेकडून होत आहे.
विद्यामंदिर बोडकेवाडी शाळा इयत्ता चौथी पर्यंत असून शाळेसाठी एकूण दोन वर्गखोल्या आहेत. दोन्ही वर्ग खोऱ्याचे शप्पथ मोडकळीस आले आहे वाशेरे पाक खराब झाले आहेत छप्पर वाकडे होऊन खाली पडण्याच्या परिस्थीतीत आहे पावसाळा वर्ग खोऱ्यामध्ये पाण्याच्या अनेक ठिकाणी गळती होत वादळवारे आल्यास चप्पल कॉल पडण्याची शक्यता आहेत परिणामी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या जीवितास धोका आहेत सदर वर्गखोल्या च्या सद्य परिस्थितीचे निरीक्षण शाळा व्यवस्थापन समितीने केले त्या वर्ग फुले यांच्या नवीन छप्पर करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने सभा क्रमांक ७ दि. ५ /२/२०२२ रोजी विषय क्रमांक २ व ठराव क्रमांक ८ नुसार नवीन लोखंडीरूप कामांमध्ये छप्पर बनवून देण्याचा प्रस्ताव केला आहे. व ग्रुप ग्रामपंचायत मेंढोली – बोलकेवाडी यांचेकडून देखील जिल्हा शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना प्रस्ताव ( ठराव ) पत्र दिले आहे. १५/२/२०२२ रोजी मागणी अर्जाने कळविण्यात आले आहे. तर १२/२/२०२२ रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आजरा यांनाही मागणी पत्र देण्यात आले आहे. परंतु अद्यापही खोली वर्गाच्या डागडुजी बाबत हालचाल दिसत नाही. दि. १३ जुन रोजी शाळा सुरू होणार आहेत. दोन – तीन दिवसात पावसाला सुरुवात होणार असून दरम्यानच्या काळातील चार-पाच दिवसात सदर शाळेची डागडुजी नाही. केल्यास विद्यार्थी व शिक्षकांना अशा छप्पर तुटलेल्या धोकादायक शाळेत शिक्षण घेण्यास व देण्याची वेळ येणार आहे. यासाठी गरज आहे. लोकसहभागातून आपल्याच मुलांना धोकादायक शाळेपासून वाचवण्यासाठी सदर शाळेतील दोन वर्गांचे छप्पराचे काम करावे.

[ दि.१५/२/२०२२ जिल्हा परिषद शिक्षण विभाग व ११/२/२०२२ रोजी गटशिक्षण अधिकारी आजरा यांना सदर शाळेची डागडुजी करावी असे विनंती पत्र देऊन देखील अद्यापही या शाळेकडे दुर्लक्ष झाले आहे पावसाला येणाऱ्या दोन चार दिवसात सुरुवात होणार असून या शाळेच्या छपराची ताबडतोब डागडुजी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे अन्यथा शालेय शिक्षण समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा. लागेल असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.