Homeकोंकण - ठाणेआमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास, ‘या’ प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सुनावली...

आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास, ‘या’ प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा.( मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली ).

आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास, ‘या’ प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा.
( मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली ).

अमरावती : – प्रतिनिधी.

जिल्हा परिषदेच्या सभेदरम्यान गट विकास अधिकाऱ्याच्या दिशेने माईक आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्याच्या प्रकरणात मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
“रोहित पवारांची लायकी…”, आमदार गोपीचंद पडळकरांची टीका; शरद पवारांवरही साधला निशाणा!
Sambhaji Raje Chhatrapati
“छत्रपती शिवाजी महाराजांना अडवण्यासाठी बाप-लेकात भांडणे…”; रायगडावरुन संभाजीराजेंचे सूचक वक्तव्य

देवेंद्रआमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास, ‘या’ प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा.( मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली ).

.

या प्रकारानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे देवेंद्र भुयार यांच्या विरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात भादंवि ३५३, १८६ व ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. रणजीत भेटाळू यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. एकही साक्षीदार फितूर झाला नाही.‍ फिर्यादी तसेच गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

गुन्हा सिद्ध झाल्याने देवेंद्र भुयार यांना न्यायाधीश एस.एस. अडकर यांनी तीन महिने साधा कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील रणजीत भेटाळू यांनी युक्तिवाद केला. अन्‍य एका प्रकरणात २०१३ मध्ये वरूडच्या तत्कालीन तहसीलदारांना शिवीगाळ, मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने देवेंद्र भुयार यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती, हे येथे उल्लेखनीय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.