बेकायदेशीर झालेली वृक्षतोतोडीची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई व्हावी. – आजरा शिवसेनेची मागणी.
( वन. परिक्षेत्र अधिकारी यांना निवेदनाने.- शंखध्वनी आंदोलनाचा इशारा. )
आजरा. – प्रतिनिधी. ०४.
आजरा तालुक्यातील मौजे वझरे घागरवाडी हद्दीतील झालेली वृक्षतोड याबाबत चौकशी होऊन संबंधितावर कारवाई व्हावी. अशा आशयाचे निवेदन शिवसेना आजरा तालुका प्रमुख राजेंद्र सावंत यांनी निवेदनाद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी आजरा यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. आजरा तालुक्यातील मौजे वझरे घागरवाडी हद्दीतील झालेली बेकायदेशीर वृक्षतोड पर्यावरणाला घातक असून या पर्यावरण विरोधात काम करणाऱ्या व परवानगी दिली असल्यास परवानगी दिलेल्या त्या अधिकाऱ्यांचा आम्ही प्रथम निषेध करतो. व संबंधित विभागाकडून परवानगी दिली असल्यास याबाबतची कागदपत्रे माहिती व पोच मिळाव्यात तसेच त्यांनी बेकायदेशीर वृक्षतोड केली आहे. याची चौकशी होऊन व अशा बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या सर्व ठेकेदारांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांच्यावर प्रथम गुन्हे दाखल करावेत याबाबत येणाऱ्या आठ दिवसात बेकायदेशीर वृक्षतोड करणार्यावर कारवाई नाही. केल्यास शिवसेना आजरा तालुक्याच्या वतीने आपल्या कार्यालया समोर शंखध्वनी आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देत आहोत. याबाबत आम्ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केले असता त्या अधिकाऱ्यांनी देखील पर्यावरणाचे कोणतेही सोयरसुतक राहिलेले नाही. त्यामुळे त्यांचे हात बरबटल्याची शंका येत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. याबाबतचे देखील निवेदन वनमंत्री यांना देण्यात येणार आहे. तरी या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या सर्वांचे व कारवाई व्हावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, उपतालुकाप्रमुख, संजय पाटील, शिवाजी आढाव, विभाग प्रमुख अनिल केसरकर, विजय कोंडुस्कर तसेच अमर डोंगरे आदींच्या सह्या आहेत.
