सेवानिवृत्त एस. टी कर्मचाऱ्यांच्या पाठवणीसाठी ‘लालपरी’ आरदाळ गावात, [ आजरा आगारातील एस्.टी. कर्मचायांनी सहकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सुरू केला आगळा-वेगळा उपक्रम ]
आजरा. – प्रतिनिधी.
सायंकाळची वेळ होती,गावात वाजतगाजत एस. टी महामंडळाची बस आणी सोबत एस. टी.चे कर्मचारीही होते. आणि सोबत फेटा बांधलेले गावातीलच एसटी महामंडळाचे कर्मचारी असा ताफा गावामध्ये दाखल झाला. आणि सर्वांचे लक्ष अचानक पणे गावात दाखल झालेल्या एस. टी बस कडे वेधले. निमित्त होते आरदाळ, ता.आजरा या गावचे एसटी कर्मचारी चालक म्हणून ३० वर्षे अखंडित सेवा बजावून आज दि. ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले, त्यांना सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करून त्यांना निरोप देण्याचे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्याची सर्वसाधारण पद्धत सर्वच विभागात परंपरेने चालत आलेली आहे. पण, आजरा आगारातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता निरोप देताना एक आगळी वेगळी आणि नवीन पद्धत आज पासून सुरु झाली आहे. आज पर्यंत ज्या लालपरीची सेवा प्रामाणिकपणे बजावली तीच ‘लालपरी’ तिच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पाठवनुक करून त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवायला कर्मचाऱ्यांचा ताफाच घेऊन आली.
आजरा आगारातील दोन कर्मचारी आज सेवानिवृत्त त्यामध्ये विष्णू उर्फ अशोक विठ्ठल डवरी.रा.आरदाळ,ता.आजरा हे चालक आपल्या 30 वर्षांच्या सेवेतून. तर जोतिबा रामचंद्र मुरगुडे हे मेकॅनिकल पदावरून सोळा वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले ते माजी सैनिक म्हणून निवृत्तीनंतर एसटी महामंडळात रुजू झाले होते. या दोन्ही कर्मचाऱ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ आजरा आगारामध्ये दिवसभर संपन्न झाला.ज्ञमात्र विनाअपघात ३० वर्ष सुरक्षितपणे प्रवाशांना सेवा देणाऱ्या चालक : विष्णू उर्फ अशोक विठ्ठल डवरी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आजरा आगारातील कर्मचारी एस. टी बस घेऊन गावापर्यंत निरोप देण्यासाठी आल्याचे पाहून खऱ्या अर्थाने त्यांचा निरोप समारंभ पार पडल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांनी, सहकाऱ्यांनी व गावकर्यांनी व्यक्त केली. “डवरी अंकल’ म्हणून आगारातील कर्मचाऱ्यांपासून ते दररोज एसटीने प्रवास करणारे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण त्यांना ओळखत होते. ज्या रुटवर नेहमी डवरी अंकल असतात त्यांना कॉलेजची शाळा-कॉलेजची मुलं-मुली, पासधारक, नोकरदार वगैरे सर्व मंडळी एस्.टी कोणतीही असो पण हमखास डवरी अंकल आमच्या रुटला येणार ना?, उद्या पण तुम्हीच आहात काय?, मला केबिन मध्ये जागा ठेवा असं शाळेची मुलं हक्काने सांगायची. एरवीदेखील रस्त्यात, बस स्टॅन्ड जवळ किंवा दुसऱ्या गावात जरी ते भेटले तरी “डवरी अंकल” अशी हाक मारूनच मंडळी पुढे जातात जात. आपल्याला देखील यापैकी बऱ्याच प्रवाशांचे चेहरे ओळखीचे झाले होते शाळेच्या विद्यार्थ्यांना, वयोवृद्धांना एसटी बस थोडक्यात चुकत असेल तरी थोडावेळ एसटी थांबवून त्यांना घेऊनच पुढे जात असल्याचे डवरी अंकल सांगतात. आज सेवानिवृत्तीच्या दिवशी एका बाजूला रोजच्या धावपळीतून विश्रांती मिळणार याचे समाधान आहे तर एका बाजूला एका बाजूला रोजच्या सवयीचा भाग झालेले सहकारी कर्मचारी, प्रवासी, एस्.टी या सर्वांची जोडली गेलेली नाळ आता तुटल्यासारखी वाटत असल्याची भाऊक शब्दात प्रतिक्रिया विष्णु डवरी यांनी दिली. आपल्या ३० वर्षांच्या सेवेमध्ये ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता २९-१२-१९९२ पासून सुरू केलेली एस.टी.ची सेवा आज पूर्ण करून या सेवेतून निवृत्त होत असताना जुन्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या. या सेवेच्या कालावधीत त्यांची पत्नी सौ.शोभा विष्णु डवरी. मोठी मुलगी भाग्यश्री व मुलगा शुभम यांचे योगदान देखिल महत्वाचे होते. वेळेवर जेवणाचा डबा तयार करणे तो आगाराकडे जाणाऱ्या बस गाडीला स्टॅंडवर वेळेत पोहोचवणे. त्यासाठी ऊन,वारा, पाऊस, थंडी कांहीही असो जाऊन उभे रहावेच लागते. आता सेवानिवृत्ती नंतर घरच्यांमध्ये वेळ घालवता येईल याचा आनंद आहे पण शासनाने देखिल एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या मापक अपेक्षा, मागण्या पूर्ण केल्या तर एस्.टी कर्मचाऱ्यांना व एस्.टी महामंडळाला देखील सोन्याचे दिवस येतील यासाठी सहकारी कर्मचाऱ्यांना नेहमी पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.