मेडिकल मास्क वापरणे योग्य आहे का.? W एच. ओ. काय म्हणते पाहा…
नवी दिल्ली वृत्तसंस्था.
सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा वेळी कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून कोरोनाच्या नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे. अशातच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सतत पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात धुणे हे दैनंदिन सवयींपैकी एक झाले आहे. मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणतं मास्क वापरणं योग्य आहे? मेडिकल मास्क आणि फॅब्रिक मास्क हे दोन्ही कोरोनापासून संरक्षण करता का? यासंदर्भातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये त्यांनी कोणत्या व्यक्तीने कोणतं मास्क कसं वापरलं पाहिजे याची माहिती दिली आहे.
मेडिकल फेस्क मास्क की फॅब्रिक मास्क.?
जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणतं मास्क वापरणं योग्य आहे.
आरोग्य कर्मचारी
ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं आहेत
जे लोकं कोरोना रूग्णांची काळजी घेत आहेत
ज्या ठिकाणी कोरोनाचा व्यापक प्रसार झाला आहे. कमीत कमी एक मीटर अंतरावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं कठीण असेल अशा ठिकाणी मेडिकल मास्क वापरणं आवश्यक आहे. तर ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक असेल, ज्यांना कोणता तरी आजार असेल अशां लोकांनी देखील मेडिकल मास्कचा वापर करावा.